Iran Israel Ceasefire: 12 दिवसांच्या युद्धानंतर इराण-इस्रायल युद्धबंदीची (Iran Israel Ceasefire) घोषणा झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) यांनी ही घोषणा केलीय. आज (24 जून) सकाळी साडेनऊपासून ही युद्धबंदी लागू होणार आहे. इराण आणि इस्त्रायलचं युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेपेक्षा कताराचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जात आहे. 

इस्रायलने कतारच्या माध्यमातून आणि अमेरिकेने मांडलेल्या अटींवर युद्धबंदी करण्यास सहमती दर्शविली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात थेट चर्चा झाली. इस्रायलने या अटीवर सहमती दर्शविली की इराणकडून यापुढे कोणतेही हल्ले होणार नाहीत. दरम्यान, तेहरानशी संबंधित वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांनीही रॉयटर्स आणि सीबीएसला दिलेल्या माहितीनूसार इराणने कतारच्या मध्यस्थीद्वारे आणि अमेरिकेने मांडलेल्या अटींवर युद्धबंदी करण्यास सहमती दर्शविली आहे.

नेमकं काय घडलं?

अमेरिकेने या युद्धात उडी घेत इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केल्यामुळे इराण खवळला होता. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची भाषाही केली जात होती. त्यानुसार कतार, सीरिया, इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणने क्षेपणास्त्र हल्लेही केले. मात्र हे हल्ले केल्यानंतर इराणने व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला. त्यानंतर अमेरिकेनेही कोणतीही कारवाई न करण्याचं मान्य केलं. सीझफायरबाबत ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या फोनवर चर्चाही झाली. त्यानंतर इराणने कतारच्या मध्यस्थीद्वारे आणि अमेरिकेने मांडलेल्या अटींवर युद्धबंदी करण्यास सहमती दर्शविली आहे.

आम्ही संयम दाखवला; इस्रायलकडून स्पष्टीकरण

इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही इराणविरुद्ध कठोर कारवाई करण्यास तयार आहोत, परंतु जर अमेरिका आणि आमच्या मित्र राष्ट्रांच्या प्रयत्नांमुळे संकट टाळता आले तर हा एक चांगला पर्याय आहे. आम्ही संयम दाखवला आहे. तथापि, इस्रायलने स्पष्ट केले की, जर युद्धबंदीचा भंग झाला तर आम्ही त्याला त्वरीत प्रत्युत्तर देऊ...

युद्धबंदीवर इराण काय म्हणाला?

डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्यावर इराणनेही युद्धबंदीच्या वृत्ताला पुष्टी दिलीय. 13 जूनला इस्रायलने इराणवर हल्ले केल्यावर गेले 12 दिवस दोन्ही देश एकमेकांवर भयंकर प्रहार करत होते. तेल अवीवपासून तेहरानपर्यंत रोज प्रचंड हानीची माहिती समोर येत होती. इस्रायल आणि इराण दोघेही माघार घेत नव्हते. इराणला नमवण्यासाठी अमेरिकेलाही यात पडावं लागलं होतं. त्यामुळे चीन रशिया नाराज होत व्यापक युद्धाचे ढग जमा होऊ लागले होते. 

संबंधित बातमी:

Iran Israel Ceasefire: इराण अन् इस्रायलचं युद्ध अखेर थांबलं; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीची घोषणा, नेमकं काय घडलं?