Iran Israel Ceasefire: इराण-इस्रायल युद्धबंदीची (Iran Israel Ceasefire) घोषणा करण्यात आली आहे. इराण आणि इस्त्रायलचं (Iran Israel War) 12 दिवस युद्ध सुरु होतं. त्यानंतर आज अखेर दोघांमधील युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (Donald Trump) ट्रम्प यांनी ही घोषणा केली. आज (24 जून) सकाळी साडेनऊपासून ही युद्धबंदी लागू होणार आहे. 

कतार आणि अमेरिकेने या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला. अमेरिकेने या युद्धात उडी घेत इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केल्यामुळे इराण खवळला होता. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची भाषाही केली जात होती. त्यानुसार कतार, सीरिया, इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणने क्षेपणास्त्र हल्लेही केले. मात्र हे हल्ले केल्यानंतर इराणने व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला. त्यानंतर अमेरिकेनेही कोणतीही कारवाई न करण्याचं मान्य केलं. इराण आणि इस्त्रायलच्या युद्धबंदीची Inside Story आता समोर आली आहे.

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनूसार, इराण अन् इस्त्रायलच्या युद्धबंदीची Inside Story:

1) कतार आणि अमेरिकेकडून मध्यस्थीची भूमिका

2) इराणने कतारतर्फे अमेरिकेला पाठवला शांतीसंदेश

3) कतारमधील अमेरिकन तळावर हल्ल्यानंतर इराणचा शांतीसंदेश

4) कोणतेही हल्ले न करण्याचं इराणचं आश्वासन

5) प्रत्युत्तरादाखल कारवाई न करण्याचं अमेरिकेचंही आश्वासन

6) इराणने पुन्हा अणुकराराबाबत चर्चा सुरू करावी, अमेरिकेची तंबी

दोन्ही देशांकडून एकमेकांवर भयंकर प्रहार-

युद्धबंदीबाबत डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या फोनवर चर्चाही झाली. हल्ले न करण्याची अट इराणने मान्य केल्यावर युद्धबंदीची घोषणा करण्यात आलीय. ट्रम्प यांनी घोषणा केल्यावर इराणनेही युद्धबंदीच्या वृत्ताला पुष्टी दिलीय. 13 जूनला इस्रायलने इराणवर हल्ले केल्यावर गेले 12 दिवस दोन्ही देश एकमेकांवर भयंकर प्रहार करत होते. तेल अवीवपासून तेहरानपर्यंत रोज प्रचंड हानीची माहिती समोर येत होती. इस्रायल आणि इराण दोघेही माघार घेत नव्हते. इराणला नमवण्यासाठी अमेरिकेलाही यात पडावं लागलं होतं. त्यामुळे चीन रशिया नाराज होत व्यापक युद्धाचे ढग जमा होऊ लागले होते.

संबंधित बातमी:

Iran Israel Ceasefire: इराण अन् इस्त्रायलचं युद्ध थांबवण्यासाठी 'या' मुस्लिम देशाचा पुढाकार; नेमकं काय घडलं?

Iran Israel Ceasefire: इराण अन् इस्रायलचं युद्ध अखेर थांबलं; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीची घोषणा, नेमकं काय घडलं?