Iran Israel America War: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा (Iran Israel America War) आज 14 वा दिवस आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींनी मोठं वक्तव्य केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार असल्यचं त्यांनी ठणकावून सांगितलंय. तसंच शत्रूचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सर्व जनतेनं एकजूटीनं उभे राहण्यासाठी आवाहन केलं आहे. मिनाबमधील शाळेतील निष्पापांच्या बळींचा बदला घेतल्याशिवाय इराण शांत राहणार नाही असा इशाराही खामेनींनी दिला आहे. तर मोजतबा यांनी इराणी लोकांना या वर्षीच्या कुद्स दिनाच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी होऊन शत्रूला इराणची ताकद दाखवा असं आवाहन केलंय.

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले सुरूच आहेत. आतापर्यंत इराणमध्ये किमान 1350 लोक मारले गेले आहेत आणि 17,000 हून अधिक जखमी झाले आहेत, ज्यात 1100 मुले आहेत. दरम्यान, इस्रायलने लेबनॉनवर आपले हल्ले तीव्र केले आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत 687 लोकांचा मृत्यू झाला आहे. UNHCR नुसार, इराणमध्ये सव्वा तीन लाख  लोक विस्थापित होतील. अमेरिकेने पहिल्यांदाच इराणविरुद्ध 15 टन वजनाचे बॉम्ब देखील वापरले आहेत. दरम्यान, इराणी क्षेपणास्त्रांनी तेल अवीव, हैफा, बेत शेमेश आणि बेरशेबासह अनेक इस्रायली शहरांना लक्ष्य केले आहे, ज्यामध्ये 14 ते 15 लोकांचा मृत्यू आणि हजारो जखमी झालेत. तर तेल अवीवच्या आसपासच्या भागातही अनेक जणांचा मृत्यू झाला. IRGC ने इराकमध्ये अमेरिकन तेल टँकरवर समुद्री ड्रोन हल्ला केला. याचदरम्यान, इराणी मीडियाकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आला. या व्हिडीओमध्ये Khamenei Is Back...असं म्हटलं आहे. 

इराणी मीडियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय? (Iran Israel America War)

अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei Death) यांचा मृत्यू झाला होता. आता इराणी मीडियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये Khamenei Is Back...असं म्हटलं आहे. तसेच या व्हिडीओमध्ये खामनी चालत येत आहे. त्यांच्या थरथरणाऱ्या हातात काठी असून खामेनींचं प्रतीक म्हणून असणारी अंगठी देखील आहे. अमेरिकेने इराणमधील मुलींच्या शाळेवर हल्ल केला होता. या हल्ल्यात एकूण 168 जणांचा मृत्यू झाला. याबाबतही व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. तसेच एकजण Khamenei Is Dead...असं डोनाल्ड ट्रम्प यांना बोलत येतो. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना फोन येतो...आणि समोरुन Khamenei Is Back...असं म्हटलं जातं. तसेच इराणकडून मिसाईल हल्ले कशा पद्धतीने केले जातील, याबाबत प्रतिकात्मक स्वरुपात दाखवण्यात आले आहे. 

‘Assembly Of Experts’ सभेवर अमेरिका आणि इस्त्रायलचा हवाई हल्ला- (Iran Israel America War)

इराणचे सर्वेसर्वा अली खामेनींच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पदावर सर्वोच्च नेता कोण असावा यासाठी Assembly Of Experts अर्थात वरिष्ठांची बैठक सुरू होती. त्या बैठकीवरच इस्रायलने जोरदार क्षेपणास्त्र हल्ला चढवला. कोम शहरात सुरू असलेल्या या बैठकीत इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते जमा झाले होते. त्याची खबर लागताच इस्रायलने या सभेलाच लक्ष्य केलं. वरिष्ठांच्या सभेत 88 सदस्य असतात. युद्ध सुरू झाल्यावर त्यातले कितीजण शिल्लक होते याची माहिती नव्हती. मात्र सभेसाठी अनेकजण आले असल्याची माहिती होती. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते मारले गेलेत. 

संबंधित बातमी:

Donald Trump on Israel Iran War: इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?