Israel Iran US War : आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या एक धक्कादायक घटना घडली असून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा अमेरिके आणि इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या बातमीनंतर सर्व देशात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत दुःख व्यक्त होताना दिसत आहे, अशातच एका सरकारी न्यूज चॅनेलवर अँकरच्या व्हिडिओने विशेष लक्ष वेधून घेत आहे. अँकर खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी सांगत असताना हमसून हमसून रडू लागला, या व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.(tv anchor cries bitterly)
व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये सरकारी टेलिव्हिजनवरील अँकर जसजसा अधिकृत मृत्यूबाबत बातमी वाचतो, तसतसे त्याचे डोळे भरून येतात आणि बोलताना त्याचे शब्द अडखळतात. खबरदारीपूर्वक सर्व बातमी वाचताना त्याच्या भावना दाटून येतात आणि रडू लागलतो, काही क्षणांसाठी तो थांबतो त्याला बोलताही येत नाही. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, अँकर खामेनेई यांना देशासाठी एक मजबूत नेतृत्वकर्ते म्हणून पाहत असे आणि त्यांच्या निधनाने देशावर खोल परिणाम झालेला आहे.
इराण सरकारने ७ दिवस सार्वजनिक सुटी, ४० दिवस राष्ट्रीय शोक जाहीर केला
इराण कॅबिनेटने या प्रसंगावर अधिकृत प्रतिक्रिया देत संपूर्ण देशात ७ दिवस सार्वजनिक सुटी आणि ४० दिवस राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. देशभरात गमकळा पसरली असून नागरिक त्रास व दु:ख व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात केवळ खामेनेईंचा मृत्यू नाही तर त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा, त्याची मुलगी, जावई आणि नातवंडाचा देखील मृत्यू झाला आहे. याशिवाय इराणचे संरक्षणमंत्री, अनेक वरिष्ठ नेते आणि सैन्य अधिकारीही या धक्कादायक प्रकरणात मरण पावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही केवळ एक हल्ला नसून, देशातील एक पारंपरिक आपत्ती आणि मोठा मानवी आणि राजकीय धक्का मानला जात आहे.
या परिस्थितीने जागतिक पातळीवर तणाव आणला आहे. तज्ञांच्या मते, खामेनेईंच्या निधनानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कडून मोठ्या प्रमाणावर उत्तर हल्ल्याची तयारी होण्याची शक्यता आहे. इराणच्या राजधानी तेहरान मध्ये सुरक्षा वाढवली असून जगभरातील देशांनी आपापल्या दूतावासांना अलर्ट दिला आहे. यादरम्यान, अमेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये काही इराण-अमेरिकी समुदायाचे सदस्य त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये विरोधाऐवजी आनंद व्यक्त करताना दिसले, जे आणखी राजकीय तणावाचे कारण बनले आहे. ही घटना जागतिक राजकारणाला मोठा चालना देणारी ठरणार आहे, ज्याचा परिणाम आणखी विस्तृत स्वरूपात दिसू शकतो.
