IAF MiG 29K Fighter Jet Crash : भारतीय हवाई दलाचं मिग 29 (MiG 29K) फायटर जेट क्रॅश (Fighter Jet Crash) झालं आहे. गोव्याजवळ मिग 29 विमानाचा अपघात झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे विमान क्रॅश होण्यापूर्वीच पायलटने स्वत:ची सुटका केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पायलटने उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. पायलटची स्थिती सध्या स्थिर आहे. मिग 29 फायटर जेट गोव्याजवळ उड्डाण करत असताना यामध्ये तांत्रिक बिघाड झाला. यानंतर फायटर जेट गोव्यातील समुद्राजवळ क्रॅश झालं. पायलटने वेळीच विमानातून समुद्रात उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. 


अपघातग्रस्त विमानातील वैमानिक सुखरुप


गोव्याजवळ भारतीय वायू दलाच्या मिग 29 लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाड झाल्याने हा विमान अपघात झाला आहे. दरम्यान या विमान अपघाताप्रकरणी वायू दलाने चौकशीचे आदेश दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान गोव्याजवळी समुद्रात कोसळलं. पायलटने अपघातग्रस्त विमानातून बाहेर समुद्रात उडी टाकत स्वत:चा जीव वाचवला. यानंतर भारतीय नौदलानं बचावकार्य राबवत वैमानिकाला समुद्रातून सुखरुप बाहेर काढलं.






विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश


विमानाला अपघात झाल्यानंतर वैमानिकाने समुद्रात उडी मारली. यानंतर नौदलाने सर्च ऑपरेशन राबवत वैमानिकाला सुखरुप बाहेर काढलं. भारतीय वायू सेनेचं मिग 29 फायटर जेट गोव्याजवळ नियमित उड्डाण करत होतं. यानंतर बेसमध्ये माघारी परतताना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि हे विमान गोव्याजवळील समुद्रात कोसळलं. वैमानिकाने उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान, या प्रकरणी बोर्ड ऑफ इन्क्वायरीने (BOI) विमान अपघाताची कारणं शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या