India vs Pakistan War:भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने आक्रमक भूमिका घेत भारताच्या नागरी वस्त्यांवर ड्रोन हल्ला करताच भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला. अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकिस्तानवर आली.दरम्यान, चीनने आपल्या नागरिकांसाठी एक निवेदन जारी केली आहे.चीनने नेपाळमधील आपल्या लोकांना भारतीय सीमेजवळ जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.नेपाळमधील चिनी दूतावासाने आणखी अनेक सूचना दिल्या आहेत. (China Advisory)
नेपाळ-भारत सीमावर्ती भागात जाणं टाळा
भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नेपाळमधील चिनी दूतावासाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेल्या निवेदनात, चिनी नागरिकांना नेपाळ-भारत सीमेवरील परिसरात जाणे टाळावे असा सल्ला दिला आहे.नेपाळ आणि भारत यांच्यात खुली सीमा असून दूतावासाने म्हटले आहे की चिनी नागरिकांनी वैध व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करणे टाळावे. दरम्यान, भारतासह नेपाळनेही वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सीमेवर सुरक्षा उपाययोजना वाढवल्या आहेत.
भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला
आधी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या हल्ल्यात भारतासह नेपाळमधील नागरिकाचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारताने पाकिस्तानला दिल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली होती. या हल्ल्याच्या काही तासांनंतर पाकिस्तानने काल रात्री भारतात ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक विमानतळं बंद ठेवण्यात आली आहेत. इंडिगोसह अनेक विमान कंपन्यांनी १० मे पर्यंत विमान उड्डाणे थांबवली आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर चीनची प्रतिक्रीया
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा, शांतता राखावी आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आम्ही दोघांनाही आवाहन करतो, असं चीनने म्हटलं आहे.
हेही वाचा:
