India-Pakistan Tension : पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का! भारताशिवाय आता 'या' देशांनीही 'आतंकिस्तान'च्या आकाशातून घेतली माघार
India-Pakistan Tension : पाकिस्तानने काही हवाई मार्ग आधीपासूनच भारतीय एअरलाइन्ससाठी बंद केले होते. आता युरोपियन एअरलाइन्सने देखील उत्तर पाकिस्तानमधील हवाई क्षेत्र टाळायला सुरुवात केली आहे.

India-Pakistan Tension : जर तुम्ही लुफ्थांसा, ब्रिटिश एअरवेज, SWISS किंवा ITA एअरवेजसारख्या युरोपियन एअरलाइन्समधून भारतात येण्याचा किंवा भारतातून युरोपला जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या प्रमुख आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सने त्यांच्या फ्लाइट मार्गांमध्ये मोठा बदल केला आहे. आता त्या पाकिस्तानच्या (Pakistan) वायुमार्गावरून उड्डाण करत नाहीत. याचा अर्थ असा की तुमचा प्रवास लांबू शकतो आणि फ्लाइटच्या वेळेत सुमारे एक तासाची वाढ होऊ शकते.
पाकिस्तानने काही दिवसांपूर्वीच भारतीय एअरलाइन्ससाठी (Indian Airlines) काही एअर वे बंद केले होते. आता युरोपियन एअरलाइन्सनीही (European Airlines) उत्तर पाकिस्तानमधील हवाई क्षेत्र टाळायला सुरुवात केली आहे. Flightradar24 च्या माहितीनुसार, 30 एप्रिलपासून हा बदल दिसून येत आहे आणि 2 मेपासून लुफ्थांसा, ITA एअरवेज आणि LOT पोलिश एअरलाईन्सने पूर्णपणे पाकिस्तानच्या वायुमार्गावरून उड्डाण करणे थांबवले आहे.
कोणत्या फ्लाइट्सवर परिणाम?
लुफ्थांसाच्या अनेक फ्लाइट्स जसे की म्यूनिख–दिल्ली, फ्रँकफर्ट–मुंबई, फ्रँकफर्ट–हैदराबाद आणि बँकॉक–म्यूनिख आता पाकिस्तानचा मार्ग चुकवून उड्डाण करत आहेत. त्याचप्रमाणे, LOT पोलिश एअरलाइन्सची वारसा–दिल्ली आणि ITA एअरवेजची रोम–दिल्ली फ्लाइटही पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून वळवण्यात आली आहे.
हा रूट बदल हा कोणत्याही नियमित वेळापत्रकाचा भाग नाही, तर सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय आहे. अनेक वरिष्ठ विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, जर भारत–पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढला, तर फ्लाइट्सना आणखी मोठ्या प्रमाणावर डाइवर्ट केले जाऊ शकते.
KLM ची अजूनही पाकिस्तानच्या वायुमार्गातून उड्डाण
जिथे अनेक युरोपीय एअरलाइन्स पाकिस्तानपासून अंतर ठेवत आहेत, तिथे KLM Royal Dutch Airlines ने सध्या तरी आपला मार्ग बदललेला नाही. एअरलाइन्सने सांगितले आहे की, ते त्यांच्या सेफ्टी अॅनालिसिसच्या आधारावरच उड्डाणाचा मार्ग ठरवतात आणि सध्या त्यांना कोणताही मोठा धोका जाणवत नाही. KLM ने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही आमच्या प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो. मार्ग नियोजनामध्ये सुरक्षेचे विश्लेषण हे आमच्या दररोजच्या प्रक्रियेचा भाग आहे."
इतर महत्त्वाच्या बातम्या
























