Gas Shortage India : अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे (Iran Israel War) आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशभरात 'अत्यावश्यक वस्तू कायदा' अर्थात ESMA लागू केला आहे. होर्मुझ जलमार्गातून होणारा गॅस पुरवठा ठप्प झाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचललं आहे.  तरदुसरीकडे अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध पुढेअसंचसुरुराहिलंतरजागतिकबाजारपेठेवरत्याचामोठापरिणामहोण्याचीशक्यतानिर्माणझालीआहे. देशातसध्याउद्भवलेलीगॅससहइतरइंधनाचीसंभाव्यतुटवडालक्षातघेताआतासरकारविशेषखबरदारीघेतांनादिसतआहे. अशातचदेशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अरागाचींना (Iran Abbas Araghchi) फोन केल्याची माहिती आहे. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीबाबत इराण आणि भारतात फोनवरून संवाद साधत चर्चा केल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

Iran Israel War : आखातातील परिस्थितीसाठी अमेरिका कारणीभूत, इराणची भूमिका

पर्शियन आखातातील परिस्थितीसाठी अमेरिका कारणीभूत असल्याची इराणची भूमिका आहे. तर अमेरिका इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे तेलवाहतूकीला अडथळा निर्माण झालाय, असं देखील इराणचं म्हणणं आहे. इराण परराष्ट्र मंत्रालयाने समाजामाध्यमात दिलेल्या माहितीनुसार 'भारताचे परराष्ट्र मंत्री सुभ्रह्मण्यम जयशंकर यांनी इस्लामिक प्रजासत्ताक इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादात त्यांनी प्रादेशिक घडामोडींवर चर्चा केली.' इराण आणि भारताचे परराष्ट्र मंत्री यांनी अमेरिका आणि इस्रायली शासनाच्या लष्करी आक्रमकतेच्या परिणामांबाबतही चर्चा केली. ज्याचा होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील जहाजवाहतुकी आणि सुरक्षेवर परिणाम होतो. पर्शियन आखातातील जहाजवाहतुकीच्या सुरक्षेच्या रक्षणाबाबत इराणच्या मूलभूत दृष्टिकोनाचा उल्लेख करताना, इराणचे परराष्ट्र मंत्री यांनी आठवण करून दिली की, पर्शियन आखातातील असुरक्षित परिस्थिती आणि जहाजवाहतुकीसाठी उद्भवलेल्या समस्या या अमेरिकेच्या आक्रमक आणि अस्थिर करणाऱ्या कृतींचा परिणाम आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने या परिस्थितीसाठी अमेरिकेला जबाबदार धरले पाहिजे." असेही ते यावेळी म्हणाले.

Continues below advertisement

Gas Shortage India : भारतात दरवर्षी किती एलपीजी वापरला जातो?

अहवालांनुसार, भारत दरवर्षी अंदाजे 31.3  दशलक्ष टन द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) वापरतो. या एकूण गरजांपैकी सुमारे 87  टक्के घरगुती स्वयंपाकात वापरला जातो. सर्वात मोठी चिंता अशी आहे की भारताच्या एकूण एलपीजी गरजांपैकी 62 टक्के आयात केली जाते आणि या आयातीपैकी 85-90 टक्के होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते. अमेरिका-इराण युद्धामुळे हा मार्ग सध्या बंद आहे. सौदी अरेबियासारख्या देशांमधून एलपीजी टँकर या मार्गाने भारतात पोहोचत असत.