नवी दिल्ली :पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे विशेष सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. भारतानं जेव्हा नूरखान एअरबेसवर ब्रह्मोसचा मारा केला तेव्हा पाकिस्तानच्या नेतृत्त्वाची काय भूमिका होती , किंवा काय वातावरण होतं, याबाबत राणा सनाउल्लाह यांनी माहिती दिली आहे. जेव्हा ब्रह्मोस मिसाईल येऊन नूरखान एअरबेसवर पडलं तेव्हा देशातील मोठ्या नेतृत्वात भीतीचं वातावरण होतं. कारण केवळ 30 ते 40 सेकंदात हा अणवस्त्र हल्ल्याचा संकेत तर नाही याचा विचार करायचा होता, असं राणा सनाउल्लाह यांनी म्हटलं.
 
पाकिस्तानातील नूरखान एअरबेस रावळपिंडीतील पाकिस्तानच्या सैन्याच्या हेटक्वार्टर पासून जवळच आहे. इस्लामाबादपासून नूरखान एअरबेस 10 किमी अंतरावर आहे. पाकिस्तानातील पत्रकार हमिद मीर यांच्यासोबत बोलताना राणा सनाउल्लाह यांनी म्हटलं की भारतानं जेव्हा ब्रह्मोस मिसाईलनं नूरखान एअरबेसवर हल्ला केला. एअरबेसवर मिसाईल पडलं होतं, पाकिस्तानच्या नेतृत्त्वाकडे तेव्हा 30 ते 40 सेकंद होते. एअरबसेवर जी मिसाईल कोसळणार आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी  फक्त 30 ते 40 सेकंद होते. 


राणा सनाउल्लाह यांनी म्हटलं की केवळ 30  सेकंदात ते अणवस्त्र आहे की नाही हे ठरवायचं होतं. यावरुन तुम्ही समजू शकता की किती धोकादायक गोष्ट होती.  राणा सनाउल्लाह पुढे म्हणाल्या की चला मला नाही वाटत त्यांनी अणवस्त्र हल्ला केला असावा, मात्र, गैरसमजातून तशा प्रकारचा हल्ला झाल्यास संपूर्ण जग अणवस्त्राच्या लढ्यात गेलं असतं.  


राणा सनाउल्लाह यांनी म्हटलं की, भारतानं ज्याचा मारा केलाय ते अणवस्त्र आहे की नाही हे ठरायचं होतं.  राणा सनाउल्लाह यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक केलं आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी जी भूमिका बजावली त्याचं वस्तूनिष्ठ विश्लेषण  करणं आवश्यक असल्याचं ते राणा सनाउल्लाह म्हणाले.
   
पाकिस्तानचे माजी विदेश मंत्री बिलावल भुट्टे झरदारी यांनी देखील अणवस्त्र हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. दरम्यान, भारताचं अणवस्त्र वापराचं धोरण नो फर्स्ट यूज असं आहे. 


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव वाढला आहे. तेव्हापासून पाकिस्तानचे पंतप्रधान संरक्षण मंत्री, विदेश मंत्री आणि लष्करप्रमुखांनी देखील अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. भारतानं भूमिका स्पष्ट केली आहे. अणवस्त्राद्वारे पाकिस्तानला धमकी देण्याचं भारताचं कारण नसेल. मात्र, आमच्या लोकांच्या संरक्षणासाठी योग्य पाऊल उचलू असं सांगण्यात आलं.