मुंबई : ब्रिटन युरोपीयन महासंघातून बाहेर पडल्याचा परिणाc भारतीय शेअर बाजारासह सोन्याच्या दरावरही झाला आहे. सोन्याच्या दरात एक तोळ्यामागे तब्बल 1700 रुपयांची वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 96 पैशांनी घसरल्याने ही वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे.


 

 

परिणामी सोन्याचे आजची किंमत 31,614 रुपये झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दराने दोन वर्षांपूर्वीची उच्चांकी पातळी गाठली आहे.

 

अवघ्या 1 मिनिटात गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचा फटका



फक्त सोनंच नाही तर चांदीचे दरही वधारले आहे. चांदीची किंमतीत आजच्या दिवसात 1400 रुपयांची वाढ झाले आहे. त्यामुळे चांदीचा आजचा दर प्रति किलो 42,500 रुपये झाला आहे.

 

ब्रिक्झिटमुळे सेन्सेक्सला ब्रेक, निर्देशांक गडगडला !


 

युरोपीयन महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्याचा भारतीय बाजारावर झाली असून सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली आहे. एकीकडे सेन्सेक्स घसरला, दुसरीकडे सोने-चांदीच्या दर वधारल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर दुहेरी संकट उभ राहिलं आहे.

 

 

दरम्यान, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार सज्ज आहे. आरबीआय आणि सरकारी यंत्रणांचं या घडामोडीवर बारीक लक्ष आहे, अर्थ खात्याच्या सचिवांनी सांगितलं आहे.

 

युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडणार