ओसाका : संपूर्ण जगाला सतावणाऱ्या तीम मोठ्या आजारांपासून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला पंचारिष्ट फॉर्म्युला दिला आहे. जपानच्या ओसाका शहरात 'जी 20' शिखर सुरु आहे. या परिषदेत ब्रिक्स देशांच्या प्रमुखांना मोदी यांनी पाच सूत्र असलेला फॉर्म्युला सुचवला.
मोदी म्हणाले की, जगाला सध्या आर्थिक मंदी, ग्रीन हाऊस इफेक्ट, दहशतवाद या तीन आजारांनी ग्रासलं आहे. या आजारांचे निराकरण करणे सोपे काम नाही. तरीदेखील त्यावर उपाय म्हणून मी पाच उपाय सुचवतो. ब्रिक्स देशांनी या पाच गोष्टी सांभाळल्या तर आपण समस्या मोठ्या प्रमाणात सोडवू शकतो.
जगाला सतावणारे तीन आजार
1. जागतिक आर्थिक मंदी आणि अनिश्चितता
2. ग्रीन हाऊस इफेक्ट
3. दहशतवाद
तीन आजारांवरील मोदींचा पंचारिष्ट फॉर्म्युला
1. BRICS देशांनी एकमेकांशी ताळमेळ राखणे, आंतरराष्ट्रीय वित्तीय आणि व्यापारी संस्था तसेच संघटनांमध्ये आवश्यक बदल करणे
2. जगाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक उर्जा संसाधनांच्या किंमती नियंत्रित ठेवणे. (उर्जा संसाधने : तेल, गॅस इत्यादी)
3. New Development Bank द्वारे सदस्य देशांच्या भौतिक, सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि अक्षय उर्जा स्त्रोतांना प्राथमिकता मिळायला हवी.
4. कुशल कारागिरांना सदस्य देशांमध्ये सहजरित्या ये-जा करणे शक्य व्हायला हवे. ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे अथवा ज्या देशांमधील बहुसंख्य लोकांनी काम करण्याची वयोमर्यादा ओलांडली आहे, (ज्या देशांमध्ये तरुणांपेक्षा वृद्धांची संख्या जास्त आहे) त्या देशांना याचा फायदा होईल.
5. दहशतवाद रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यायला हवं. सर्व देशांना एकत्रित आणण्यासाठी भारत स्वतः परिषदेचे आयोजन करेल.
जी20 शिखर परिषद : जगाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मोदींचा पंचारिष्ट फॉर्म्युला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jun 2019 12:36 PM (IST)
संपूर्ण जगाला सतावणाऱ्या तीम मोठ्या आजारांपासून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला पंचारिष्ट फॉर्म्युला दिला आहे.
Getty Images)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -