Earthquake in Afghanistan : अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी मोजण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या फैजाबाद जिल्ह्यात गुरुवारी (6 मार्च) सकाळी 7.06 वाजता हा भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय वृत्तसंस्थेना याबाबतची माहिती दिली आहे.


अफगानिस्तानमध्ये 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप


अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा जमीन हादरली असून फैजाबादपासून 285 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू 107 किलोमीटर खोल होता,  ही माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.






अफगाणिस्तानात सात दिवसांत तिसऱ्यांदा भूकंपाचे हादरे


अफगाणिस्तानला सात दिवसांत तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. गुरुवारी सकाळी भूकंपाचा झटका बसला. याआधी 8 मार्च रोजी 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू 136 किमी खोलीवर होती. भूकंपाचे धक्के  जाणवत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


2 मार्चलाही झाला होता भूकंप


यापूर्वी 2 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 2:35 वाजता अफगाणिस्तानच्या फैजाबाद भागात 4.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS - National Centre for Seismology) नुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू 245 किमी खोल होता.


भारतीय शास्त्रज्ञाचाही धोक्याचा इशारा


तुर्की (Turkey) आणि सीरियामधील (Syria) भूकंपामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या भूकंपामध्ये तब्बल 45 हजारहून जणांचा मृत्यू झाला असून 80 हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. तुर्की आणि सीरियाप्रमाणे भारतामध्येही मोठा भूकंप येईल, असा अंदाज प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ आणि भूर्गभशास्त्रज्ञाने केला आहे. हैदराबादमधील एनजीआरआयच्या मुख्य शास्त्रज्ञाच्या मते, भारतीय टेक्टोनिक प्लेट सरकत असल्याने हिमालयीन प्रदेशात भूकंपाचा धोका वाढत आहे.


फ्रेंच शास्त्रज्ञाचीही भूकंपाबाबत भविष्यवाणी


याआधी एका फ्रेंच शास्त्रज्ञाने ही भारतात येत्या काळात भूकंप येणार असल्याचं भाकित केलं आहे. याच भूर्गभशास्त्रज्ञाने तुर्की आणि सीरियाच्या भूकंपाबाबत वर्तवलेला अंदाजही खरा ठरला आहे. भूगर्भशास्त्रज्ञ आणि डच संशोधक फ्रँक हूगरबीट्स  (Frank Hoogerbeets) यांनी भारतातही भूकंप होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. हूगरबीट्स यांनी भारताबद्दल भाकित करत सांगितलं आहे की, भारताला मोठा भूकंपाचा धक्का बसणार आहे. हिंद महासागर क्षेत्रातील देश म्हणजे भारत, पाकिस्तानसह अफगाणिस्तानलाही याचा झटका बसणार आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी चीन आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Earthquake : 'भारतातही होणार विनाशकारी भूकंप'; व्हायरल भविष्यवाणीनंतर आता भारतीय शास्त्रज्ञाचाही धोक्याचा इशारा