Drone Crashes in Russia : युक्रेनचा (Ukraine) रशियावर (Russia) ड्रोनद्वारे हल्ला (Drone Attack) करण्यात आला आहे. रशियावर करण्यात आलेला ड्रोन हल्ला साधासुधा नसून हुबेहुब अमेरिकेच्या 9/11 च्या हल्ल्यासारखाच आहे. रशियाच्या एंजेल्स हवाई तळावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. युक्रेननं रशियातील 38 मजली इमारतीत ड्रोननं हल्ला केला आहे. 


आज (26 ऑगस्ट) युक्रेननं रशियातील 38 मजली उंच इमारतीवर ड्रोननं हल्ला केला. युक्रेनचे ड्रोन थेट इमारतीत घुसलं. ड्रोनच्या धडकेनं किमान 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना व्होल्गा स्काय या सेराटोव्ह शहरातील सर्वात उंच 38 मजली इमारत आहे. त्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार, एक ड्रोन उडताना दिसत आहे, ते ड्रोन थेट 38 मजली इमारतीत घुसलं आणि आग लागली. इमारतीच्या काचा फुटल्यानं खाली उभ्या असलेल्या 20 हून अधिक वाहनांचंही नुकसान झालं आहे.






युक्रेनवर ड्रोनचा हल्ला 


मॉस्कोच्या दक्षिण-पूर्वेकडील प्रदेशाच्या गव्हर्नरनं सांगितलं की, युक्रेननं सोमवारी रशियाच्या साराटोव्ह भागातील दोन प्रमुख शहरांमध्ये अनेक ड्रोन हल्ले केले आहेत. यामध्ये एका महिलेसह दोन जण जखमी झाले असून घराचं नुकसान झालं आहे. प्रादेशिक गव्हर्नर रोमन बसुर्गिन यांनी टेलिग्रामवर सांगितलं की, रशियन हवाई संरक्षण यंत्रणेनं युक्रेनियन ड्रोन खाली पाडलं, ज्याच्या ढिगाऱ्यामुळे साराटोव्ह शहरातील निवासी संकुलाचं नुकसान झालं आहे.






9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण 


11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत 9/11 चा दहशतवादी हल्ला झाला होता. युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर संपूर्ण जगाच्या त्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. अमेरिकेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यात गगनचुंबी इमारतींना लक्ष्य करण्यात आले, ज्यात 3000 लोक मारले गेले. आज रशियातही अशाच एका इमारतीवर ड्रोन हल्ल्याने 9/11 च्या हल्ल्याची आठवण करून दिली. अमेरिकेत अल कायदाच्या दहशतवाद्यांनी 4 विमानांचे अपहरण करून ते अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनमध्ये फोडले.


एक महिला गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल 


प्रादेशिक गव्हर्नर रोमन बसुरगिन यांनी सांगितलं की, एका महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी सांगितलं की, यावेळी युक्रेनच्या लष्करानं रशियातील साराटोव्ह येथील सर्वात उंच इमारतीला लक्ष्य केलं आणि ड्रोन उडवलं. युक्रेनियन लष्कराच्या ड्रोननं साराटोव्हमधील निवासी इमारतीला धडक दिली. या हल्ल्यात अर्ध्या इमारतीचं नुकसान झालं असून या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेवर उपचार सुरू असून डॉक्टर तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.