Doomsday Clock : डूम्सडे क्लॉकनं (Doomsday Clock) वेळेसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. जगाचा शेवट कधी होणार, हे प्रतीकात्मकदृष्ट्या सांगणाऱ्या, 'डूम्सडे क्‍लॉक'ने प्रथमच घड्याळात 10 सेकंदांची घट केली आहे.  आता जग विनाशाच्याजवळ आल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीय. त्याचं कारण प्रलयाच्या घड्याळानं संकेत दिले आहे. त्या घड्याळानुसार आता जगाच्या विनाशासाठी  केवळ 90 सेकंद उरले आहेत. त्यामुळं जगभरात अनेकांची चिंता वाढलीय.


तीन वर्षानंतर बदलली वेळ


जगाचा सर्वनाश होणार, अशी अफवा अधून-मधून पसरत असते. युक्रेन - रशिया युद्ध (Ukraine - Russia war) कोरोना महामारी (corona crisis ) आदींच्या पाश्वभूमीवर 'डूम्सडे क्‍लॉक'मधील वेळ 10 सेकांदांनी कमी करण्यात आल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.  पहिल्यांदाच जग विनशाच्या इतक्या जवळ पोहोचले आहे. तीन वर्षापूर्वी घड्याळ 100 सेकंदवर थांबले होते. परंतू,  युक्रेन रशियातील युद्धामुळे जगाचा अंत त्या घड्याळानुसार आता जगबुडीला केवळ 90 सेकंद उरले आहेत. त्यामुळं जगभरात अनेकांची चिंता वाढली आहे. 


आण्विक शस्त्र आणि हवामान बदलाचा मोठा फटका


जग सध्या कोरोना महामारी (Corona Virus Pandemic), अण्विक युद्ध (Nuclear War) आणि हवामानातील बदल (Climate Change) यासारख्या गोष्टींचा सामना करत आहे. घड्याळाचे काटे मध्यरात्रीपासून 90 सेकंद दूर आहेत. हे काटे मध्यरात्रीच्या आधीपेक्षा जास्त जवळ आहेत. जगातील देश आण्विक हत्यार आणि हवामान बदल यासारख्या संकटांचा सामना करण्यासाठी तयार नाहीत. कारण आण्विक हत्यारांच्या वापरांचा मोठा फटका जगातील देशांना बसू शकतो. 


घड्याळाची निर्मिती कधी झाली?


या घड्याळाची निर्मिती बुलेटिन ऑफ द एटॉमिक साइन्टिस्ट्स या ग्रुपनं  1947 मध्ये केली होती. हा एक नॉन प्रॉफिट ग्रुप असून याची सुरूवात वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन आणि यूनिवर्सिटी ऑफ शिकागोच्या विद्यार्थ्यांनी 1945 मध्ये केली होती. यांच्या बोर्डाच्या सदस्यांमध्ये 13 नोबल पुरस्कार विजेते आहेत. हे घड्याळ दर्शवतं, की पृथ्वी या भयंकर घटनांपासून किती दूर आहे. तसंच आण्विक आणि हवामान बदलाच्या धोक्याचा जगावर कधी परिणाम होईल याबाबतची माहिती देखील यातून समजते. 1945 साली हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या हल्ल्यानंतर घड्याळाची निर्मिती करण्यात आली आहे. हे घड्याळ जगाच्या विनाशाची वेळ दाखवते. आण्विक हल्ल्यासारख्या मानवनिर्मित आपत्तींच्या तीव्रतेवरून या घड्याळाची वेळ कमी, अधिक केली जाते. डूम्सडे क्लॉक हे एक सांकेतिक घड्याळ आहे.  1991 साली  जग विनाशापासून 17 मिनिटे दूर होते. आता 32  वर्षानंतर  फक्त  90 सेकंद उरले आहेत.