Donald Trump : "व्हाईट हाऊस पुन्हा एकदा गोळीबाराच्या आवाजाने हादरलं! डिनरसाठी गेलेल्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना लक्ष्य करण्यासाठी एक माथेफिरू अनेक शस्त्रास्त्रांसह हॉटेलमध्ये घुसला. सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हा मोठा कट उधळून लावला आहे. पण ट्रम्प आणि मृत्यूचा हा खेळ नवा नाही; कधी विषारी रसायनं तर कधी थेट गोळीबार... पाहुयात आतापर्यंत ट्रम्प यांच्यावर किती वेळा आणि कसे हल्ल्याचे प्रयत्न झाले."(Donald Trump)
Donald Trump All Over attacks : आधी ट्रम्प या हल्ल्यातून थोडक्यात बचावले
२६ जुलै 2016ओहिओडिमेसिमा नावाचा माथेफिरू सभेत ट्रम्पवर चाल करुन गेला
१८ जून 2016 लास वेगासहत्येचा प्रयत्न फसला,पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबाराचा होता इरादा
५ नोव्हेंबर 2016 रेनो,नेवादामध्ये ट्रम्प भाषण देताना एक जण बंदूक नावाने ओरडला, ट्रम्प स्टेज सोडून गेले
६ सप्टेंबर २०१७मंडान, उत्तर डकोटाफोर्कलिफ्ट ट्रक ट्रम्पच्या ताफ्यात घुसवण्याचा अयशस्वी प्रयत्न
१ ऑक्टोबर २०१८ काही पार्सलद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची पाकिटे पाठवली
१० ऑगस्ट २०२०ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी एका सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊसबाहेरच ठार केले
१३ जुलै २०२४बटलर, पेनसिल्वानिया जाहीर सभेतील भाषणावेळी थॉमस क्रूक्सनं झाडल्या ट्रम्पवर आठ गोळ्या,एक कानाला चाटून गेली, ट्रम्प जखमी
१५ सप्टेंबर २०२४पाम बिच, फ्लोरिडाट्रम्प गोल्फ खेळत असलेल्या मैदानात तरुण बंदुकीसह झुडपात दडला, जवानाने गोळीबार करताच पळाला
२५ एप्रिल २०२६हॉटेल हिल्टनमध्ये डिनरसाठी गेले असता बॉलरुममध्ये गोळीबार, प्रत्युत्तरात हल्लेखोर ठार
Donald Trump : नेमकं काय घडलं?
शनिवारी रात्री व्हाईट हाऊस वार्ताहरांच्या वार्षिक स्नेहभोजन सोहळ्याबाहेर गोळीबाराची घटना घडली . राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असून अमेरिकेच्या इतर वरिष्ठ नेत्यांना बॉलरूममधून बाहेर काढण्यात आले.सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला. एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितल्याप्रमाणे एका सुरक्षा अधिकाऱ्याला गोळी लागली, मात्र बुलेटप्रूफ जाकीट परिधान केलेले असल्याने ते सुखरुप असण्याची अपेक्षा आहे.एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार एक संशयित ताब्यात घेण्यात आला आहे.सीक्रेट सर्व्हिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी वॉशिंग्टन हिल्टन येथील सभागृहात धाव घेतली. शेकडो उपस्थितांनी टेबलाखाली आसरा घेतला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया ट्रम्प आणि इतर वरिष्ठ नेत्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेच्या काही व्हिडिओंमध्ये मोठे आवाज ऐकू आल्याचा दावा करण्यात आला होता, किंबहुना या व्हिडिओंची सत्यता अद्याप पडताळली गेलेली नाही. एका वृत्तानुसार, या आवाजानंतर उपस्थितांना बाहेर काढण्यात आले आणि परिसर सील करण्यात आला आहे.
