US-Iran Peace Deal : गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या अत्यंत तीव्र युद्धजन्य तणावाच्या (Middle East Conflict) पार्श्वभूमीवर शुक्रवारी जागतिक शांततेच्या दृष्टीने एक अतिशय मोठी आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची (Abbas Araghchi) यांनी 'दोन्ही देश आतापर्यंतच्या सर्वात ऐतिहासिक शांतता कराराच्या अगदी जवळ पोहोचले आहेत' अशी महत्त्वाची घोषणा केली. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्वतः त्यांच्या 'ट्रुथ सोशल' (Truth Social) या सोशल मीडिया अकाउंटवर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही पोस्ट री-शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Continues below advertisement

या दोन्ही जागतिक नेत्यांच्या सकारात्मक हालचालींमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पश्चिम आशियात सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष आता थांबणार असून शांतता करार (Peace Deal) होणार असल्याच्या आशा कमालीच्या वाढल्या आहेत.

Abbas Araghchi Post : अब्बास अरागची यांची पोस्ट नेमकी काय?

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी आपल्या अधिकृत पोस्टमध्ये दोन्ही देशांमधील चर्चेचा संदर्भ देत लिहिले आहे की, 'इस्लामाबाद मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग' (Islamabad Memorandum of Understanding MoU) आता अंतिम टप्प्यात असून दोन्ही देश कराराच्या सर्वात जवळ आहेत.

Continues below advertisement

Donald Trump On Peace Deal : डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्त्वाचे संकेत

अरागची यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच जाहीर केलं होतं की इराणसोबतच्या युद्धावर अखेर तोडगा काढण्यात आला आहे. ट्रम्प यांनी सांगितलं की, "शांतता करारावर अधिकृत स्वाक्षरी करण्यापूर्वी काही तांत्रिक आणि प्रक्रियात्मक पावले उचलणे बाकी आहे. आता फक्त दस्तऐवजांना अंतिम रूप दिले जात असून, येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होईल."

Abbas Araghchi Appeal To Media : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

या अत्यंत संवेदनशील चर्चेच्या दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी आंतरराष्ट्रीय मीडिया संस्था आणि जागतिक तज्ज्ञांना एक विशेष आवाहन केले आहे. "जोपर्यंत दोन्ही देशांमधील अंतिम बोलणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या कराराबाबत कोणत्याही प्रकारच्या तर्क-वितर्कांना किंवा अफवांना ऊत आणू नये," असं अरागची यांनी म्हटलं आहे. तसेच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कराराचे सर्व तपशील अधिकृतपणे सार्वजनिक केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

दरम्यान, इराणच्या स्थानिक मीडियाने या संभाव्य कराराचा '14 कलमी मसुदा' (14-Point Agreement) प्रसिद्ध केला होता. यावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर लिहिले की, "मीडियामध्ये ज्या काही गोष्टींचा दावा केला जात आहे, त्याचा आणि आमच्यात लेखी स्वरूपात ठरलेल्या अटी व शर्तींचा दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाही. कराराचा मसुदा चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे."

दोन्ही देशांच्या प्रमुखांनी कराराला हिरवा कंदील दाखवल्यामुळे येत्या दोन दिवसात युरोपमध्ये या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जागतिक शेअर बाजारासह कच्च्या तेलाच्या किमतींनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

ही बातमी वाचा :