Donald Trump: वॉशिंग्टन डीसी येथे 'व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशन'च्या डिनर कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या उपस्थितीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ट्रम्प यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन सुरक्षा यंत्रणांची माहिती दिली. विशेषतः इराणसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला इराणने घडवून आणला का? असा प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी सध्यातरी अशी कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले.

Continues below advertisement

Donald Trump: हल्ल्यामागे इराणचा हात? ट्रम्प म्हणाले...

पत्रकारांनी जेव्हा ट्रम्प यांना विचारले की, या हल्ल्याचा इराणशी काही संबंध आहे का? तेव्हा ट्रम्प म्हणाले, "सुरुवातीच्या माहितीनुसार तसे दिसत नाही. हा हल्ला एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग वाटत नसून, एका माथेफिरू व्यक्तीने केलेले हे कृत्य असावे. तो एकटाच काम करत होता, असे संकेत मिळत आहेत. सखोल तपासानंतरच पूर्ण सत्य समोर येईल."

Donald Trump: सुरक्षा यंत्रणांचे कौतुक आणि हल्लेखोराची माहिती

ट्रम्प यांनी माहिती दिली की, हल्लेखोर हा कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. त्याने अनेक शस्त्रास्त्रांसह सुरक्षा चौकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 'सीक्रेट सर्व्हिस'च्या जवानांनी जीवाची बाजी लावून त्याला रोखले. "सुरक्षा दलांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली. एका सुरक्षा अधिकाऱ्याला गोळी लागली आहे, पण बुलेटप्रूफ जॅकेटमुळे तो सुरक्षित आहे," असेही ट्रम्प यांनी नमूद केले.

Continues below advertisement

Donald Trump: कार्यक्रमांच्या नियोजनात बदल नाही

गोळीबारानंतर इनडोअर (बंदिस्त) कार्यक्रमांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न विचारले असता, ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, ते अशा भीतीपोटी आपले कार्यक्रम किंवा कार्यपद्धती बदलणार नाहीत. "ज्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होता, तो पूर्णपणे सुरक्षित होता. हल्ला माझ्यावरच करण्याचा प्रयत्न असू शकतो, मात्र आम्ही हिंसेला घाबरणार नाही," असे धाडसी विधान त्यांनी केले.

Donald Trump: पारदर्शकतेसाठी व्हिडिओ जारी करण्याचे आदेश

या घटनेत नेमकं काय घडलं आणि सुरक्षा यंत्रणांनी कशी कारवाई केली, हे जनतेला समजावे यासाठी ट्रम्प यांनी या घटनेचा व्हिडिओ जारी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, देशातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करत त्यांनी "मतभेद हिंसेने नाही तर शांततेने सोडवले पाहिजेत," असा संदेश दिला.

आणखी वाचा 

PM Narendra Modi on Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर प्रोग्राममध्ये गोळीबार; भारताची पहिली प्रतिक्रिया, पीएम मोदी म्हणाले, 'लोकशाहीत हिंसेला...'