Donald Trump: अमेरिका आणि इराणमधील (US-Iran Relations) तणाव आता पराकोटीला पोहोचला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या वीकेंडपर्यंत लष्कराला इराणवर नवीन आणि मोठा हल्ला करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, या प्रस्तावित लष्करी कारवाईचा मुख्य उद्देश तेहरानला गुडघे टेकण्यास भाग पाडणे हा आहे.
Donald Trump: 'आम्ही जोरदार हल्ला करू'; ट्रम्प यांचा इशारा
मॅरिलँड येथील 'कॅम्प डेव्हिड'येथे कॅबिनेट बैठकीदरम्यान ट्रम्प म्हणाले, "आम्ही त्यांच्यावर अत्यंत जोरदार हल्ला करू. एक अशी वेळ येईल जेव्हा इराण म्हणेल की ते आता हे आणखी सहन करू शकत नाहीत." तसेच, वॉशिंग्टन इराणच्या मुख्य ऊर्जा केंद्रांना, जसे की वीज निर्मिती केंद्र आणि पेट्रोलियम रिफायनरी यांना लक्ष्य करण्याच्या विचारात आहे. जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
Donald Trump: मानवाधिकार संघटनांनी व्यक्त केली चिंता
मानवाधिकार संघटनांनी अमेरिकेच्या या संभाव्य पावलावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. "सामान्य नागरिकांच्या वापरासाठी असलेल्या नागरी सुविधांना जाणूनबुजून लक्ष्य करणे हा थेट युद्ध गुन्हा ठरू शकतो," असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, व्हाईट हाऊसच्या (White House) प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी स्पष्ट केले की, "जोपर्यंत इराण अध्यक्ष ट्रम्प यांना मान्य असेल अशा पद्धतीने वाटाघाटीसाठी तयार होत नाही, तोपर्यंत त्यांना याची किंमत मोजावीच लागेल."
US-Iran Conflict: जागतिक बाजारपेठेवर परिणाम
या घडामोडींमुळे जागतिक तेल बाजारावरही परिणाम झाला आहे. संभाव्य संघर्षाच्या भीतीमुळे वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूड तेलाच्या किमती प्रति बॅरल 86 अमेरिकन डॉलरच्या पुढे गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी यापूर्वीही इराणविरोधात कठोर लष्करी कारवाईचे इशारे दिले होते. मात्र दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिकेच्या लष्करी साठ्यावर मोठा ताण आल्याचीही चर्चा सुरू आहे. याआधी 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर संपूर्ण मध्यपूर्व प्रदेशात अस्थिरता वाढली. त्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि खतांसाठी आवश्यक मालवाहतुकीवर परिणाम होऊन जागतिक पुरवठा साखळीवर दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
