Joe kent resigns Trump Reaction: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा आजचा 19वा दिवस आहे. अशातच आता इराणविरोधात अमेरिकन सैन्यातच बंडाळी माजल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे (National counter Terrorism centre) प्रमुख जोसेफ केंट यांनी मंगळवारी  राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. जोसेफ केंट (Joe kent) यांनी युद्धाच्या निषेधार्थ राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. इराणकडून (Iran) अमेरिकेला   धोका नव्हता. तसेच युद्ध सुरू होण्यामागे इस्रायलचा (Israel) दबाव कारणीभूत असल्याचा आरोप जो केंट यांनी केला. जो केंट यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पत्र लिहून युद्धाबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली. पेंटागॉनकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, इराणविरुद्धच्या यु्द्धात संघर्षात आतापर्यंत अमेरिकेचे सुमारे 200 सैनिक जखमी झाले आहेत. (America Iran War)

जो केंट यांचा राजीनामा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जात आहे. जो केंट यांनी राजीनामा देताना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, इराणचा आपल्या देशाला कोणताही धोका नाही. इस्रायलचा अमेरिकेत असणारा प्रभावी दबावगट यांच्यामुळे हे युद्ध सुरु झाले. त्यामुळेच माझी विवेकबुद्धी  या युद्धाबाबत ट्रम्प प्रशासनाला पाठिंबा देऊ शकत नाही, हे त्यांनी राजीनाम्याच्या कारणात स्पष्ट केले. 

जो केंट यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांना विचारणा करण्यात आली. त्यावर ट्रम्प यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत केंट यांचा आक्षेप उडवून लावला. जो केंट चांगला माणूस आहे. पण सुरक्षेच्या बाबतीत अतिशय दुर्बळ आहे. मात्र, मी जेव्हा त्याचे पत्र वाचले तेव्हा मला वाटलं की, तो बाहेर पडला ते चांगले झाले. कारण इराण हा अमेरिकाला धोका नाही, असे तो म्हणाला. इराण हा अमेरिकेसाठी धोका आहे, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले. 

Donald Trump on Nato countries: नाटो देशांचा मदतीला येण्यास नकार, डोनाल्ड ट्रम्प संतापले

होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांना त्यांच्या युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. जेणेकरुन इराणची सामुद्रधुनीतील नाकेबंदी मोडीत काढून होर्मुझमधून आंतरराष्ट्रीय व्यापार पुन्हा सुरु करता येईल, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची योजना होती. मात्र, नाटो देशांपैकी फ्रान्स, इंग्लंड यांनी या युद्धात भाग घेण्यास नकार दिला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले. त्यांनी म्हटले की, आम्हाला कधीही नाटो देशांच्या मदतीची गरजच नव्हती. नाटो देश आम्हाला मदत न करुन मुर्खपणा करत आहेत. आम्हाला त्यांच्या मदतीची गरज नाही पण या परिस्थितीत त्यांनी आमच्यासोबत असायला हवे होते. आम्ही युद्धातून माघार घेण्यास तयार नाही, पण आम्ही लवकरच तेथून बाहेर पडू, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

आणखी वाचा

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा मृत्यू? डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा; म्हणाले...