Donald Trump On Iran Israel America War: सतत युद्धाची खुमखुमी असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. एरवी कुठल्याही युद्धात अमेरिकेचं समर्थन करणारे नाटो देशही अमेरिकेला साथ देण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सध्या एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) सुरक्षित करण्यासाठी आणि ती पुन्हा खुली करण्यासाठी मदत म्हणून युद्धनौका पाठवाव्यात, असे आवाहन आपण काही देशांना केले होते. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना कुणीही साथ दिली नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आज चांगलेच संतापल्याचे दिसले. (iran israel america war)

आम्हाला कोणाचीही गरज नाही. आमचं जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र आहोत. आमचं लष्कर सर्वात शक्तीशाली आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मी गेल्या अनेक वर्षांपासून हेच ​​सांगत आलो आहे की, जर कधी आम्हाला त्यांची गरज भासली, तर ते मदतीला धावून येणार नाहीत. नाटो संघटनेवरही डोनाल्ड ट्रम्प यांनी निशाणा साधला. जर मित्रराष्ट्रांनी मदत केली नाही, तर या संघटनेचे भविष्य अंधकारमय असेल, असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. (iran israel america war)

डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे सात देशांशी केली होती चर्चा- (iran israel america war)

तेलवाहू जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी युद्धनौका तैनात कराव्यात, अशी विनंती करत डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे सात देशांशी चर्चा केली होती. मात्र, जर्मनी, स्पेन आणि इटलीसारख्या देशांनी ही विनंती स्पष्टपणे नाकारली. ब्रिटननेही सुरुवातीला दोन विमानवाहू युद्धनौका (aircraft carriers) देण्यास नकार दिला होता. परंतु संघर्ष संपल्यानंतर त्यांनी त्या देण्याची तयारी दर्शवली. मात्र ट्रम्प यांनी ती ऑफर नाकारली. युद्ध संपल्यानंतर मला युद्धनौकांची काहीच गरज नाही, असं प्रत्युत्तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनला दिले. 

कोणत्या देशाने, कोणती भूमिका मांडली? (iran israel america war)

  1. इटली- अमेरिका-इस्रायलनं इराणवर हल्ला करुन आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन केलं.
  2. जपान- होर्मुझच्या सामुद्रधुनीत मालवाहू जहाजांच्या सुरक्षेसाठी आमचं नौदल पाठवणार नाही.
  3. ऑस्ट्रेलिया- होर्मुझमध्ये आम्ही आमची जहाजं उतरवणार नाही.
  4. तुर्किए- अमेरिकेचा हल्ला हा एक धोका, आम्हाला युद्धापासून दूरच राहायचंय. 
  5. ब्रिटन- चर्चेतून तोडगा निघावा याचंच आम्ही समर्थन करु
  6. जर्मनी- हे युद्ध आमचं नाही, इराणमध्ये जे होतंय ते अनाकलनीय
  7. स्पेन- इराणचं युद्ध युक्रेन-रशियासारखंच उद्ध्वस्त करणारं आहे. युद्ध नव्हे शांततेला प्राधान्य द्या
  8. फ्रान्स- अमेरिकेचा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणारा

इराणची 100 जहाजं आणि युद्धनौका बुडवल्या, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा (iran israel america war)

इराणला आम्ही पूर्णपणे उद्धवस्त केलं आहे. इराणचं हवाई दल आणि नौदल संपलं आहे. इराणची 100 जहाजं आणि युद्धनौका बुडवल्या, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम आणि त्यांचं रडार नष्ट केलं आहे. इराणचे नेते मारले गेले आहेत. ते 47 वर्षांपासून दहशत पसरवत आहेत. आता त्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.जी काही वर्षांपूर्वी करायला पाहिजे होती, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

संबंधित बातमी:

Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा