Continues below advertisement


China Victory Day Parade : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनच्या सैन्य परेड (China Military Parade) संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping), रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि उत्तर कोरियाचे नेता किम जोंग उन (Kim Jong Un) हे मिळून अमेरिकेविरोधात (USA Conspiracy) कट रचत आहेत. यावर रशियाकडून (Russia Reaction) तातडीची प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रम्प यांचे वक्तव्य म्हणजे जोक असल्याचं रशियाने म्हटलं.


Trump reminds Xi Jinping about WW II : ट्रम्प यांच्याकडून इतिहासाची उजळणी


बीजिंगच्या थियानमेन चौक (Tiananmen Square Parade) येथे झालेल्या भव्य परेडमध्ये आधुनिक शस्त्रास्त्रांचे (Modern Weapons), मिसाइल्सचे (Missiles) आणि सैन्य टुकड्यांचे प्रदर्शन करण्यात आले. यात रशिया आणि उत्तर कोरियाच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अधिक चर्चेत आला.


यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले की, “शी जिनपिंग यांनी लक्षात ठेवायला हवे की दुसऱ्या महायुद्धात (World War II) अमेरिकेने चीनला परकीय आक्रमणापासून वाचवण्यासाठी मोठी मदत केली होती. अनेक अमेरिकी सैनिकांनी बलिदान दिलं आणि चीनने त्याचा आदर केला पाहिजे.”


Russia Statement on Trump Claim : रशिया कट रच नाही


रशियाच्या परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव (Yuri Ushakov) यांनी सांगितले की, “पुतिन, शी जिनपिंग आणि किम जोंग उन मिळून अमेरिकेविरुद्ध कोणताही कट रचत नाहीत. तिघांपैकी कोणाच्याही मनात तसा विचार आलेला नाही.”


बीजिंगमध्ये (Beijing) झालेल्या चीनी सैन्य परेड (Victory Day Parade China) दरम्यान शी जिनपिंग यांनी अमेरिकेचा उल्लेख न करता इशारा दिला होता. आता जगाला शांतता (Peace) आणि युद्ध (War) यामध्ये निवड करावी लागेल असं शी जिनपिंग म्हणाले.


Trump on US Military Power : अमेरिका सर्वात शक्तिशाली, ट्रम्प यांचा दावा


अमेरिका, रशिया आणि चीनच्या धुरीवर बोलताना ट्रम्प म्हणाले की, “मी अजिबात चिंतित नाही. आमच्याकडे जगातील सर्वात मजबूत सेना (US Military) आहे. ते कधीही आमच्याविरुद्ध लष्करी कारवाई करू शकणार नाहीत.”


चीनच्या भव्य सैन्य परेडमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. ट्रम्प यांनी जरी कटाचा आरोप केला असला तरी रशियाने तो स्पष्टपणे नाकारला आहे. मात्र चीन-रशिया-उत्तर कोरिया (China Russia North Korea) या तिकडीची मंचावर एकत्र उपस्थिती अमेरिकेसाठी (USA vs China-Russia) राजनैतिक आव्हान ठरू शकते.



ही बातमी वाचा: