न्यूयॉर्क :अमेरिकेनं व्हेनेझुएलाची राजधानी काराकास येथे नागरी ठिकाणं आणि लष्करी तळांवर एअर स्ट्राइक केले. यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलास मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक करत देशाबाहेर नेलं आहे. अमेरिकेच्या एअर फोर्सनं काराकाससह मिरांडा, अरगुआ आणि ला गुइरा या भागात देखील बॉम्ब वर्षाव केला. 

Continues below advertisement

ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. देशाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी अमेरिकेच्या ताब्यात आहे. अमेरिकनं या कारवाईसाठी ड्रग्ज तस्करीचं कारण दिलं असलं तरी व्हेनेझुएलातील तेल साठे हे प्रमख कारण असल्याचं बोललं जातंय.अमेरिकेनं आज व्हेनेझुएलावर हल्ले केले असले तरी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ते तेल कंपन्यांबाबत बोलताना दिसून येतात. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत ट्रम्प यांनी तेल कंपन्यांचा उल्लेख केल्याचं पाहायला मिळतं. ट्रम्प म्हणतात,'आमचा तेलाचा अधिकार त्यांनी हिसकावून घेतला, आमच्याकडे तिथं खूप तेल होतं, त्यांनी आमच्या कंपन्यांना तिथून हाकलून दिलं, आम्हाला ते परत हवंय.' डोनाल्ड ट्रम्प यांचा हा व्हिडिओ  18 डिसेंबरचा आहे.  ट्रम्प त्यांच्या एअरफोर्स वन मध्ये जाण्यापूर्वी मीडियोसोबत बोलत होते.  

Continues below advertisement

ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर हल्ला करताना ड्रग्ज तस्करीचा आरोप करत जहाजांवर हल्ले करत असले तरी त्यांचं मुख्य टार्गेट व्हेनेझुएलातील तेल साठे आहेत. अमेरिकेनं व्हेनेझुएलाच्या मालवाहतूक जहाजांवर क्षेपणास्त्राचे हल्ले केले आहेत. ट्रम्प यांनी या हल्ल्यांचं समर्थन केलं आहे. व्हेनेझुएला अमेरिकेत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी करत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. ड्रग्ज तस्करी अमेरिकेच्या जवानांनी रोखल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. ट्रम्प याचाच आधार घेत निकोलस मादुरो यांना ड्रग्ज तस्कर म्हणत आहे.  

व्हेनेझुएलाची अमेरिकेला ऑफर 

व्हेनेझुएलानं अमेरिकेला 2 डिसेंबरला एक ऑफर दिली होती. ज्यानुसार ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी अमेरिकेसोबत करार करण्यासाठी चर्चेला तयार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना निकोलस मादुरो यांचं सरकार बदलायचं होतं, कारण मादुरो यांनी अमेरिकन तेल कंपन्यांना देशाबाहेर काढलं होतं. ही बाब निकोलस मादुरो यांना माहिती होती.  

ट्रम्प यांचा मोठा प्लॅन?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरुन अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्यानं व्हेनेझुएला चारी बाजूनं घेरलं आहे. ट्रम्प व्हेनेझुएलामध्ये वारंवार लष्कर घुसवण्याची धमकी देत होते. अखेर, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सैन्यामार्फत व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केलाय.