Israel Iran War : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य करत अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली आहे. इराणमध्ये अमेरिकन सैन्य तैनात केले जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, मात्र गरज पडल्यास कारवाई करण्यास अमेरिका मागे हटणार नाही, असेही संकेत दिले. 19 मार्च 2026 रोजी दिलेल्या प्रतिक्रियेत ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत ती मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाल्याचा दावा केला.
US Military Stand : सैन्य पाठवण्याबाबत स्पष्ट भूमिका
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “मी कुठेही सैन्य पाठवत नाही, आणि जर पाठवत असतो, तर ती माहिती सार्वजनिक केली नसती. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सैन्य पाठवण्याबाबत भीती नसल्याचेही म्हटलं होतं. मात्र सध्याच्या वक्तव्यात त्यांनी प्रत्यक्ष तैनातीबाबत सावध भूमिका घेतल्याचे दिसते.
Iran Threat Claim : इराणची लष्करी ताकद कमी?
ट्रम्प यांनी दावा केला की इराणची नौसेना आणि वायुसेना मोठ्या प्रमाणावर निष्क्रिय झाली आहे. इराणची एअर डिफेन्स सिस्टम नष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला. अमेरिकेला कोणत्याही भागात मुक्तपणे कारवाई करता येईल, असं ते म्हणाले. तसेच अमेरिकेवर कुणीही हल्ला करू शकत नाही असा विश्वासही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला.
Kharg Island : खर्ग बेटावर कब्जा करण्याचा इशारा
खर्ग बेटाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, “आम्ही कधीही या बेटावर कब्जा करू शकतो. ते पूर्णपणे असुरक्षित आहे.” खर्ग बेट इराणच्या तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, त्यामुळे या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Netanyahu Talks : इस्रायलशी संवाद
ट्रम्प यांनी बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी संवाद झाल्याचेही सांगितलं. ते म्हणाले की, तेल आणि गॅस क्षेत्रांवर हल्ले टाळावेत, असा सल्ला त्यांनी इस्रायलला दिला होता.
Global Allies: जपानचा पाठिंबा, युरोपवर टीका
ट्रम्प यांनी जपानकडून मिळालेल्या समर्थनाचे कौतुक केलं, तर युरोपीय देशांवर नाराजी व्यक्त केली. इराण युद्धात जपान सक्रिय भूमिका घेत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. तर NATO देश अपेक्षित सहकार्य करत नसल्याची टीका त्यांनी केली. स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या सुरक्षेबाबत युरोप निष्क्रिय असल्याचा आरोप यावेळी ट्रम्प यांनी केला.
Global Impact: वाढता तणाव आणि ऊर्जा संकट
पश्चिम आशियामधील वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम भारतासारख्या देशांवर होऊ शकतो.
ही बातमी वाचा:
