Russia Ukrain War : गेल्या सहा महिन्यांच्या काळात सहा मोठी युद्धे थांबवल्याचा दावा करणारे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)आता रशिया आणि युक्रेनचेही युद्ध थांबवणार का असा प्रश्न विचारला जात आहे. याला कारणही तसेच आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांची भेट घेतल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांना अमेरिका भेटीसाठी आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत युद्धविरामाबाबत (Ceasefire Talks) महत्त्वपूर्ण हालचाली होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अमेरिकेचे (United States) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनयांची भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावरही त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर यूक्रेनचे (Ukraine) राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना वॉशिंग्टन भेटीसाठी आमंत्रण दिले आहे.
व्यापक शांततेसाठी प्रयत्न करणार
झेलेन्स्की यांनी एका निवेदनात सांगितले की, ते रशियासोबतच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षाचा (Russia-Ukraine War) शेवट करण्यासाठी ‘रचनात्मक सहयोग’ (Constructive Cooperation) करण्यास तयार आहेत. ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या दीर्घ फोन संभाषणानंतर (Telephonic Conversation) त्यांनी हे वक्तव्य केले. अॅक्सिओसच्या (Axios Report) अहवालानुसार, पुतिन युद्धविरामाऐवजी व्यापक शांतता करारासाठी (Peace Agreement) प्राधान्य देत असल्याचे ट्रम्प यांनी सूचित केल्याची माहिती आहे.
या आधीची भेट वादग्रस्त
झेलेन्स्की सोमवारपासून वॉशिंग्टन दौऱ्यावर (Washington Visit) जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या वादग्रस्त भेटीनंतर (Oval Office Meeting) ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची ही दुसरी प्रत्यक्ष भेट ठरणार आहे.
अलीकडेच अलास्का शिखर परिषदेत (Alaska Summit) युद्धविरामाबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी परतीच्या प्रवासात झेलेन्स्की आणि युरोपियन (European Leaders) नेत्याांसोबत चर्चा केली. ही चर्चा तब्बल तासभर चालल्याची माहिती देण्यात आली आहे.
अंतिम निर्णय झेलेन्स्कींच्या निर्णयावर
झेलेन्स्की यांनी सांगितले की, ट्रंम्प यांच्यासोबतची चर्चा ‘दीर्घ आणि अर्थपूर्ण’ (Meaningful Discussion) होती आणि अमेरिकेकडून (US Security Assurances) मिळणाऱ्या सुरक्षा आश्वासनांबाबत (Security Guarantees) सकारात्मक संकेत मिळाले आहेत. युरोपियन देशांचा यात महत्त्वाचा वाटा असणार असल्याचे ट्रम्प यांनी मान्य केले असले तरी अंतिम निर्णय झेलेन्स्की यांच्या भूमिका आणि पावलांवर अवलंबून असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वॉशिंग्टनमध्ये परत आल्यानंतर व्हाईट हाऊसच्या (White House) प्रेस सचिव कैरोलीन लेविट (Karoline Leavitt) यांनी माहिती दिली की ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर लगेचच नाटो (NATO) राष्ट्रप्रमुखांशी फोनद्वारे चर्चा केली आहे. त्यामुळे आता Global Diplomacy Triangle युद्धविरामाच्या दिशेने वळते का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
या घडामोडींमुळे जागतिक राजकारणात (International Politics) मोठे परिवर्तन होण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांत रशिया-यूक्रेन युद्धावर मोठी घोषणा (Major Announcement) होण्याची चर्चा सुरु आहे.
ही बातमी वाचा: