न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ट्रम्प यांनी इराणची लष्करी क्षमता संपली आहे. आम्ही इराणच्या 7 हजार पेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ला केल्याचं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की चीन आणि जपाननं आमची मदत करावी.  

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की इराणचं सरकार संपवण्यासठी आमचं शक्तिशाली लष्करी अभियान गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. इराणला आम्ही पूर्णपणे उद्धवस्त केलं आहे. इराणचं हवाई दल आणि नौदल संपलं आहे. इराणची 100 जहाजं आणि युद्धनौका बुडवल्या आहे. अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम आणि त्यांचं रडार नष्ट केलं आहे. इराणचे नेते मारले गेले आहेत. ते 47 वर्षांपासून दहशत पसरवत आहेत. आता त्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.जी काही वर्षांपूर्वी करायला पाहिजे होती.  

Donald Trump : इराणमध्ये 7000 ठिकाणांवर हल्ले

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या 7000 ठिकाणांवर हल्ले केल्याचं म्हटलं आहे. ज्यात बहुतांश व्यावसायिक ठिकाणं आणि सैन्य तळ होते. इराणची  बॅलेस्टिक मिसाईल लाँच क्षमता 90 टक्के कमी झाली  आहे. तर ड्रोन हल्ल्यांची क्षमता 95 टक्के कमी झाली आहे. आम्ही मिसाईल आणि ड्रोनच्या उत्पादन कारखान्यांवर हल्ले केले आहेत आणि ते सुरु आहेत.  

ट्रम्प यांनी खार्ग बेटावर हल्ले करुन ते नष्ट केल्याचा दावा केला. त्या बेटावरील तेलाचा साठा सोडून इतर सर्व उद्धवस्त केलं आहे. आम्ही भविष्यातील इराणच्या पुनर्निमाणासाठी योग्य काम केलं आहे. आता इराण पुन्हा क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता वाढवू शकणार नाही. असं ट्रम्प म्हणाले.   

डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी चांगल्या स्थितीत आहे. आम्ही इराणला अगोदर नियंत्रित केलं आहे. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर शस्त्रासारखा करत आला आहे. इराणनं याचा वार आर्थिक शस्त्र म्हणून केला, तो जास्त काळ करता आला नसता. काही देशांनी म्हटलं की आम्ही त्या दिशेनं पुढं जात आहोत.