एक्स्प्लोर

Donald Trump : अमेरिका- इराण करारावर आज स्वाक्षरी होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा,  इराणच्या भूमिकेनं नवा ट्विस्ट...

US Iran Peace Deal: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासंदर्भातील शांतता करारावर आज स्वाक्षरी होऊ शकते, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.  

US Iran Peace Deal नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध 28 फेब्रुवारीला सुरु झालं होतं. या संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगभर झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानुसार इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी शांतता करारावर आज स्वाक्षरी होऊ शकते. दुसरीकडे पाकिस्तानकडून देखील अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं. पुढील 24 तासांमध्ये यावर दोन्ही देशांचे प्रतिनिधी स्वाक्षरी करु शकतात, असा दावा पाककडून करण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट केली आहे.  ते म्हणाले करारावर स्वाक्षरी उद्या होणार आहे. करावर सही झाली की होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली जाणार आहे.  ."

इराणची वेगळीच भूमिका 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर इराणच्या विदेश मंत्रालयानं वेगळीच भूमिका मांडली. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाघेई यांनी रविवारी कोणत्याही करारावर स्वाक्षरी होणार नसल्याचं म्हटलं. रविवारी करारावर स्वाक्षरी झाली नाही तर येत्या काळात त्यासंदर्भात प्रगती दिसेल असं देखील इस्माइल बाघेई म्हणाले. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारावर 24 तासात स्वाक्षरी होऊ शकते असा दावा केला. पाकिस्तानकडून अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी केली जाते.  

इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी देखील शुक्रवारी येत्या काही दिवसांमध्ये करारावर स्वाक्षीरी होऊ शकते म्हटलं होतं. तर दुसरीकडे एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यानं करार होण्याची शक्यता 80 ते 85 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचं म्हटलं.  

होर्मुझची सामुद्रधुनी महत्त्वाचा मुद्दा

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी महत्त्वाचा आणि तणावाचा मुद्दा बनला आहे. गेल्या काही महिन्यांपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक बंद असल्यानं जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

एप्रिलमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये दीर्घकालीन शांतता कराराबाबत अनेकदा चर्चा झाल्या मात्र आतापर्यंत ठोस परिणाम दिसून आले नाहीत. ट्रम्प यांनी अनेकदा करार अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं मात्र चर्चा लांबल्या होत्या.  

अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील लष्करी तणाव या आठवड्यात पुन्हा वाढला होता. यामुळं पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात होते काय अशी भीती निर्माण झाली होती. 28 फेब्रुवारीला युद्ध झाल्यानंतर 7 एप्रिलला शस्त्रसंधी झाली होती. त्यानंतर आतापर्यंत छोटे मोठे हल्ले प्रतिहल्ले देखील धाल्याचं पाहायला मिळालं होतं. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PoK Protest : ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणचा हल्ला, पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू तर 10 जण जखमी 
होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणचा हल्ला, पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू तर 10 जण जखमी 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TV Actress Struggle Life: वयाच्या 7व्या वर्षी सोडलं घर, फुटपाथवर ब्युटी प्रोडक्ट्स विकून भरलं पोट; पुढे TV ची फेव्हरेट सुनबाई बनली अन् थेट केंद्रीय मंत्रिपदी वर्णी
वयाच्या 7व्या वर्षी सोडलं घर, फुटपाथवर ब्युटी प्रोडक्ट्स विकून भरलं पोट; पुढे TV ची फेव्हरेट सुनबाई बनली अन् थेट केंद्रीय मंत्रिपदी वर्णी
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
Embed widget