Donald Trump on Strait of Hormuz न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रथ सोशल या प्लॅटफॉर्मवर दोन पोस्ट केल्या आहेत. त्या पोस्टमधून त्यांनी इराणवर हल्लाबोल केला आहे. याशिवाय होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्णपणे नियंत्रण असल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत. होर्मुझमध्ये स्फोटकांचे सुरुंग पेरणाऱ्या छोट्या बोटींवर हल्ले करण्याचे आदेश अमेरिकन नौदलांना दिल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील दुसऱ्या टप्प्यातील शांततेची चर्चा पुढं जात नसल्यानं अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

Donald Trump : होर्मुझवर अमेरिकन नौदलाचं वर्चस्व : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण त्यांच्या कठिण काळातून जात असून त्यांचा नेता कोण यासाठी ते संघर्ष करत आहेत, असं म्हटलंय. युद्धात कट्टरत लोक पराभूत होत आहेत  त्यांचा आणि  सुधारणावादी आहेत त्यांच्यात संघर्ष सुरु आहे. सुधारणावादी पूर्णपणे सुधारणावादी नसले तरी त्यांना थोड्या फार प्रमाणात आदर मिळतोय, हा वेडेपणा आहे. आमचं होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण आहे. अमेरिकेच्या नौदलाच्या परवानगीशिवाय एकही जहाज सामुद्रधुनीत येऊ शकत नाही किंवा तिथून जाऊ शकत नाही. सामुद्रधुनीची पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत इराण करार करत नाही तोपर्यंत अशीच स्थिती राहील, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये अमेरिकन नौदलाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. इराणची कोणतीही जहाजं, छोट्या बोटी  ( नौदलाची जहाजं 159 असतील, जी समुद्राच्या तळाशी असतील) त्याद्वारे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील पाण्यात सुरुंग ठेवत असतील त्यावर हल्ले करुन नष्ट करा, असं ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकन नौदलानं यासंदर्भात कोणतीही हयगय करु नये. सामुद्रधुनी पूर्णपणे मोकळी आणि स्वच्छ करत आहोत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या सुरु असलेली कारवाई तिप्पटीनं वाढवा, अशा प्रकारचे आदेश देणारे आदेश ट्रम्प यांच्याकडून देण्यात आले आहेत.

ट्रम्प यांच्याकडून अमेरिकन स्तंभ लेखकाची पोस्ट शेअर 

अमेरिकन स्तंभलेखक मार्क थायसेन यांनी जर इराणमध्ये दोन गट असतील आणि एका गटाला करार हवा असेल आणि दुसऱ्या गटाला करार नको असेल तर करार नको असल्याला गटाला मारुन टाका, असं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या स्तंभलेखकाची पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आलेल्या घोषणांना किंवा दाव्यांना इराणकडून कशाप्रकारे उत्तर दिलं जातं ते पाहावं लागेल.