Trump put extra tariff on India  वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं अमेरिकेनं भारतावर नव्याने लादलेल्या टॅरिफमुळे हि टक्केवारी आता 50 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर भारताची कोंडी केल्यानंतर दुसरीकडे मात्र अमेरिका आणि पाकिस्तान जवळ येत असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्थानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) दुसऱ्यांदा अमेरिकेला भेट देणार आहेत. पाक न्यूज वेबसाइट डॉनच्या वृत्तानुसार, मुनीर या वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात वॉशिंग्टनला भेट देऊ शकतात. असा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, असीम मुनीर यांनी ऑपरेशन सिंदूरनंतरही अमेरिकेला भेट दिली होती. त्यानंतर पुन्हा ते पुन्हा अमेरिकेला जाणार असल्याचे बोललं जात आहे. अमेरिका आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्याचे हे लक्षण असू शकतं, असेही बोललं जात आहे. तर पुढे आलेल्या वृत्तानुसार, मुनीर अमेरिकन आर्मी जनरल आणि युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडचे कमांडर मायकेल कुरिला यांच्या निरोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत. मुनीर याच कारणासाठी वॉशिंग्टनला जात आहेत. त्यांच्या कार्यकाळात कुरिला यांनी पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध कारवाई करणारा भागीदार म्हणून वर्णन केले होते.

अमेरिकन जनरलने पाकिस्तानची प्रशंसा का केली?

अमेरिकेचे कणखर आर्मी जनरल कुरिला यांनी मध्य पूर्वेत आपल्या सैन्याचे नेतृत्व केले आहे. ते या महिन्यात निवृत्त होत आहेत. 'द हिंदू' मधील एका वृत्तानुसार, कुरिला यांनी काही महिन्यांपूर्वी पाच आयसिस दहशतवाद्यांना अटक केल्याबद्दल पाकिस्तानचे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले होते की अमेरिकेने दिलेल्या माहितीच्या आधारे पाकिस्तानने दहशतवाद्यांना अटक करून उत्तम काम केले आहे.

मुनीर-ट्रम्प भेटीवर व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया काय?

मुनीर यांनी या वर्षी जूनमध्ये अमेरिकेला भेट दिली होती. त्यांनी ट्रम्प यांच्यासोबत जेवणही केलं होते, ज्याची बरीच चर्चा झाली. ट्रम्प आणि मुनीर यांची सुमारे दोन तास बैठक झाली. ट्रम्प यांनी मुनीर यांना आमंत्रित केल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले होते. त्यात म्हटले होते की ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध रोखण्याची शिफारस केली आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेशन सिंदूरनंतर ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील युद्धबंदीचे श्रेय अनेक वेळा घेतले आहे. त्यामुळे पुढे होऊ घातलेल्या या भेटीची चर्चा कितपत खरी ठरते आणि या भेटीत नेमकं काय होतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या