Donald Trump Buffalo Bangladesh: बांगलादेशात सध्या एका दुर्मिळ पांढऱ्या (Albino) रेड्याची (Buffalo) जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नावावरून 'डोनाल्ड ट्रम्प' असे नामकरण करण्यात आलेल्या या 700 किलो वजनाच्या रेड्याची ईदच्या (Eid) पार्श्वभूमीवर होणारी कुर्बानी अखेर टळली आहे. शेवटच्या क्षणी बांगलादेशचे पंतप्रधान (PM) तारिक रहमान (Tarique Rahman) यांच्या सरकारने हस्तक्षेप करत या रेड्याची कुर्बानी थांबवली असून, त्याला थेट राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात (National Zoo) पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर (Social Media) हा रेडा प्रचंड व्हायरल (Viral) झाला होता.

Donald Trump Buffalo Bangladesh: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी 'हेअरस्टाईल' ठरली मुख्य आकर्षण

हा रेडा ईदच्या कुर्बानीसाठी आधीच विकला गेला होता. मात्र, त्याच्या सोशल मीडियावरील व्हिडिओंनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. सुमारे 700 किलो वजनाच्या या रेड्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याच्या डोक्यावर झुलणारे सोनेरी केस आहेत. लोकांना त्याची ही स्टाईल हुबेहूब अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रसिद्ध हेअरस्टाईलसारखी वाटली. त्यामुळे इंटरनेटवर नेटकऱ्यांनी त्याचे नाव ‘डोनाल्ड ट्रम्प’ ठेवून दिले. ढाका जवळील नारायणगंज येथील फार्मवर या अनोख्या रेड्याला पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी उसळली होती.

Donald Trump Buffalo Bangladesh: सुरक्षेच्या कारणास्तव सरकार मैदानात

रेड्याला पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन बांगलादेशचे गृहमंत्री (Home Minister) सलाहुद्दीन अहमद यांच्या आदेशानंतर सरकारने तातडीने पावले उचलली. सरकारने खरेदीदाराचे सर्व पैसे परत केले असून, या रेड्याला ढाका येथील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सुरक्षेच्या कारणास्तव अखेरच्या क्षणी हा निर्णय घेण्यात आला." असे असले तरी, ट्रम्प यांच्या नावावरून कोणताही अनावश्यक राजकीय किंवा आंतरराष्ट्रीय ताण निर्माण होऊ नये, म्हणूनच सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Donald Trump Buffalo Bangladesh: अतिशय शांत स्वभाव आणि खास काळजी

फार्मचे मालक जियाउद्दीन मृधा यांनी सांगितले की, त्यांच्या लहान भावाने या रेड्याचे केस पाहून त्याचे नाव 'डोनाल्ड ट्रम्प' ठेवले होते. 4 वर्षांच्या या दुर्मिळ एल्बिनो रेड्याला 10 महिन्यांपूर्वी खरेदी करण्यात आले होते. त्याची अत्यंत विशेष काळजी घेतली जाते, ज्यामध्ये त्याला नियमित आहार देणे आणि वारंवार अंघोळ घालणे समाविष्ट आहे. इतर प्राण्यांच्या तुलनेत हा रेडा अतिशय शांत स्वभावाचा आहे.

Donald Trump Buffalo Bangladesh: का खास असतात 'एल्बिनो' प्राणी?

बांगलादेशात बहुतांश म्हशी किंवा रेडे हे काळ्या किंवा गडद राखाडी रंगाचे असतात, त्यामुळे पांढरे किंवा एल्बिनो रेडे अत्यंत दुर्मिळ (Rare) मानले जातात. 'एल्बनिझम' हा एक अनुवांशिक बदल आहे, ज्यामध्ये शरीरात 'मेलानिन' नावाचे रंगद्रव्य तयार होत नाही. यामुळे प्राण्यांची त्वचा हलकी गुलाबी किंवा पांढरी, केस सोनेरी आणि नाक गुलाबी रंगाचे दिसते. याच दुर्मिळतेमुळे तो लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. आता हा 'डोनाल्ड ट्रम्प' नावाचा रेडा ढाका राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे वैभव वाढवणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...