Donald Trump on Mojtaba Khamenei: अमेरिका-इस्रायल यांनी 28 फेब्रुवारी रोजी इराणवर (US-Israel vs Iran War) केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणध्ये आयतुल्ला खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei) यांची सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याबाबत मोठा दावा केलाय.
मोजतबा खामेनी हे जिवंत नाहीत, असं मोठं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. तसेच मोजतबा खामेनी हे जिवंत असतील तर त्यांनी शरण यावे, असे आव्हान देखील त्यांनी दिले आहे. इराण आता तडजोडीची भाषा करत आहे. मात्र, आम्ही इराणशी कोणत्याही अटीशर्थींशी तडजोड करण्यास तयार नाही, असे देखील ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एनव्हीसी वृत्तवाहिनीशी फोनवर संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराण काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Mojtaba Khamenei: मोजतबा खामेनींवर 1 कोटी डॉलर्सचे बक्षीस जाहीर
दरम्यान, अमेरिकेने इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी आणि त्यांच्या 9 वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबाबत माहिती देणाऱ्यास 1 कोटी डॉलर्सचे (सुमारे ८३ कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले आहे. 'रिवॉर्ड्स फॉर जस्टिस' अंतर्गत माहिती देणाऱ्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची ऑफरही देण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एपिक फ्युरी मोहीम’ अंतर्गत इराणच्या सत्ताधारी व्यवस्थेला थेट इशारा दिला आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीला केवळ बक्षीसच नव्हे, तर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची संधीही अमेरिकेकडून दिली जाणार आहे. 28 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. या निर्णयामागे इराणवर मानसिक दबाव निर्माण करणे, त्यांची अंतर्गत यंत्रणा कमकुवत करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे, हा अमेरिकेच्या रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे.
Who is Mojtaba Khamenei: कोण आहेत मोजतबा खामेनी?
मोजतबा खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे दुसरे पुत्र आहेत. ते कट्टरपंथी विचारसरणीचे आणि प्रभावशाली रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. 1980 च्या दशकात झालेल्या इराण-इराक युद्धादरम्यान त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे सांगितले जाते. इराणच्या क्रांतिकारी रक्षक दलावर (रिव्होल्युशनरी गार्ड्स) त्यांची मोठी पकड असल्याचे मानले जाते. 2019 मध्ये अमेरिकेने त्यांच्यावर कठोर निर्बंधही लादले होते.
आणखी वाचा
