एक्स्प्लोर

Mark Carney: ट्रम्पनी इराणला अश्मयुगाची धमकी दिली, पण नाकाशेजारच्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला उद्देशून फक्त एक वाक्य उच्चारताच समोरून उभं राहून टाळ्यांचा कडकडाट!

कॅनडामध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या असून मार्क कार्नी यांनी जस्टिन ट्रूडो यांच्यानंतर पदभार स्वीकारला. कार्नी यांनी सत्तेत येताच 'कॅनडियन प्रथम' (Buy Canadian) धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे.

Canada PM Mark Carney: "जर कॅनडाला अमेरिकेशिवाय जगणे इतके कठीण जात असेल, तर कॅनडाने अमेरिकेचे 51 वे राज्य का बनू नये?" अशी खोचक टिप्पणी 2024 मध्ये अमेरिकन राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. ट्रम्प यांनी पुढे अशीही मिश्किल टिप्पणी केली की, जर कॅनडा 51 वे राज्य झाले तर ट्रूडो 'पंतप्रधान' (तत्कालिन पंतप्रधान) ऐवजी त्या राज्याचे 'गव्हर्नर' म्हणून काम करू शकतील. यानंतर आता  कॅनडाचे नवनियुक्त पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यांनी कॅनडाच्या 'Defence Industrial Strategy' (संरक्षण औद्योगिक धोरण) अंतर्गत ही घोषणा केली आहे.

कॅनडाची मुख्य घोषणा काय आहे?

आतापर्यंत कॅनडा आपल्या संरक्षण खरेदीसाठी (Defense Procurement) मोठ्या प्रमाणावर अमेरिकेवर अवलंबून होता. याआधी कॅनडाच्या एकूण संरक्षण खर्चापैकी जवळपास 70 टक्के रक्कम अमेरिकन कंपन्यांकडे जात होती. पंतप्रधान कार्नी यांनी जाहीर केले आहे की, आता पुढील 10 वर्षांत कॅनडा आपल्या संरक्षण खरेदीचा 70 टक्के हिस्सा देशांतर्गत (कॅनडियन) कंपन्यांना देईल. अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करणे आणि कॅनडाची स्वतःची 'संरक्षण स्वायत्तता' (Strategic Autonomy) निर्माण करणे हा यामागे आहे. संरक्षण सामग्रीसाठी अमेरिकेला 70 टक्के जाणारा खर्च हा आता काळ संपल्याचे कार्नी म्हणाले. त्यांच्या या वाक्याला समोरून टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली. 

कॅनडात परिस्थिती का बदलली?

कॅनडामध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या असून मार्क कार्नी यांनी जस्टिन ट्रूडो यांच्यानंतर पदभार स्वीकारला. कार्नी यांनी सत्तेत येताच 'कॅनडियन प्रथम' (Buy Canadian) धोरण राबवण्यास सुरुवात केली. ट्रम्प यांनी कॅनडावर लावलेले 25 टक्के टॅरिफ आणि सीमेवरील वाढता ताण यामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले आहेत. यामुळे स्वतःचे संरक्षण साहित्य स्वतःच बनवण्याची गरज कॅनडाला भासू लागली. नाटो (NATO) देशांना आपल्या जीडीपीच्या 2 टक्के खर्च संरक्षणावर करणे बंधनकारक होते. कॅनडाने मार्च 2026 मध्ये हे लक्ष्य वेळेआधीच साध्य केले आहे. आता हा वाढलेला पैसा अमेरिकेला देण्याऐवजी स्वतःच्या देशात गुंतवण्याचा कार्नी सरकारचा विचार आहे.

नोव्हेंबर 2024 मध्ये काय म्हणाले ट्रम्प?

नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, ट्रम्प यांनी जाहीर केले होते की ते पदभार स्वीकारताच कॅनडा आणि मेक्सिकोतून येणाऱ्या सर्व वस्तूंवर 25 टक्के आयात शुल्क (Tariff) लावतील. कॅनडाकडून होणारी अमली पदार्थांची तस्करी (Fentanyl) आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी त्यांनी हा दबाव तंत्राचा वापर केला होता. डिसेंबर 2024 च्या सुमारास फ्लोरिडा येथील 'मार-अ-लागो' (Mar-a-Lago) येथे ट्रम्प आणि कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यात एक बैठक झाली. 

कॅनडामध्ये या विधानावर तीव्र संताप 

या बैठकीत तत्कालिन पीएम ट्रूडो यांनी ट्रम्प यांना समजावण्याचा प्रयत्न केला की, 25 टक्के टॅरिफमुळे कॅनडाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. यावेळी ट्रम्प यांनी उपरोधिकपणे म्हटले की, "जर कॅनडाला अमेरिकेशिवाय जगणे इतके कठीण जात असेल, तर कॅनडाने अमेरिकेचे 51 वे राज्य का बनू नये?" यामागे कॅनडा व्यापारासाठी अमेरिकेवर किती अवलंबून आहे, याची जाणीव करून देणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. कॅनडामध्ये या विधानावर तीव्र संताप व्यक्त झाला. कॅनडाच्या सार्वभौमत्वाचा (Sovereignty) हा अपमान असल्याची भावना तिथल्या जनतेत निर्माण झाली होती. ट्रम्प यांच्या अशा वागणुकीमुळेच कॅनडामध्ये मार्क कार्नी यांच्यासारख्या नेत्यांचा प्रभाव वाढला, ज्यांनी "अमेरिकेवरचे अवलंबित्व कमी करून स्वतःचे संरक्षण आणि अर्थव्यवस्था मजबूत करा" असा नारा दिला. ट्रम्प यांच्या त्या एका विधानाने कॅनडाला आपल्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणात आमूलाग्र बदल करण्यास भाग पाडले.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अमेरिकेचा इराणनंतर आणखी एका देशात एअरस्ट्राईक,धोकादायक दहशतवादी मारला गेल्याचा ट्रम्प यांचा दावा
अमेरिकेचा इराणनंतर आणखी एका देशात एअरस्ट्राईक,धोकादायक दहशतवादी मारल्याचा ट्रम्प यांचा दावा
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
Agreements Between India And UAE मोठी बातमी: एकीकडे पेट्रोल, डिझेल, CNG चे दर वाढले; दुसरीकडे यूएईकडून भारताला मोठ्ठं गिफ्ट, दोन्ही देशांमध्ये 5 करार
एकीकडे पेट्रोल, डिझेल, CNG चे दर वाढले; दुसरीकडे यूएईकडून भारताला मोठ्ठं गिफ्ट, दोन्ही देशांमध्ये 5 करार
Maharashtra Live Blog Updates: राष्ट्रवादी नेत्या रूपाली चाकणकर यांची 5:30 तास ED चौकशी; नेमकं काय -काय घडलं?
Maharashtra Live Blog Updates: राष्ट्रवादी नेत्या रूपाली चाकणकर यांची 5:30 तास ED चौकशी; नेमकं काय -काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget