न्यूयॉर्क : ब्लू ओरिजिन मिशननं सोमवारी यशस्वीपणे ऐतिहासिक सब ऑर्बिटल  स्पेस फ्लाईट पूर्ण केली. विशेष बाब म्हणजे यामधील क्रू मेंबर्स सर्व महिला आहेत.  अंतराळ संशोधनातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. सहा सदस्यांच्या टीममध्ये पॉप स्टार कैटी पैरीचा समावेश आहे. हा प्रवास न्यू शेफर्ड रॉकेटद्वारे करण्यात आला. 
 
ब्लू ओरिजिन मिशनची लाँचिंग विंडो अमेरिकेतील सीडीटी वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता सुरु करण्यात आली. हे लाँचिंग पश्चिम टेक्सासमध्ये पार पडलं. 






ब्लू ओरिजिन मिशन NS-31 ही मनुष्यांना घेऊन जाणारी 11 वी स्पेसफ्लाईट ठरली आहे. हा प्रवास 11 मिनिटांमध्ये पूर्ण झाला.  ब्लू ओरिजिनच्या माहितीनुसार रॉकेटनं पृथ्वीच्या 60 मैल  उंचावरुन प्रवास केला. कर्मन लाईनच्यावरुन हा प्रवास करण्यात आला. 






या फ्लाईटमध्ये अमेरिकेतील उद्योजक  आणि हेलिकॉप्टर पायलट लाउरेन सॅनचेझ, टीव्ही निवेदक गेयल किंग, आयशा बोवे, अमांडा न्गुयेन, केरियन फ्लिन यांचा समावेश आहे. पॉपस्टार कैटी पॅरिनं म्हटलं की 15 वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे.


स्पेस फ्लाईटच्या 64 वर्षांच्या मानवी प्रवासात पहिल्यांदा प्रत्येक सीटवर महिला होती, असं ब्लू ओरिजिननं म्हटलं. 1963 मध्ये सोव्हिएतची म्हणजेच अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेशकोवा तीन दिवसांच्या  मोहिमेदरम्यान अंतराळात जाणारी पहिली एकटी महिला बनली होती.


ब्लू ओरिजन मिशनचं कॅप्सूल सूक्ष्म गुरूत्वाकर्षण कक्षेत पोहोचताच सहा महिलांनी त्यांचे बेल्ट काही क्षणांसाठी काढले होते. त्यावेळी पैरी गाणं म्हणत होतं. तिनं अंतरळात व्हाट अ वंडरफुल वर्ल्ड हे गीत म्हटलं. गेल किंग यांनी तिला रोर आणि फायरवर्क गीत म्हणण्याची विनंती केल्याचं म्हटलं.  यावेळी पैरीनं जगाबद्दल गाणं म्हणायचं असल्याचं सांगितलं. 




दुसरीकडे गेल किंगला पाठिंबा देण्यासाठी तिची मैत्रीण ओप्रा विन्फ्रे आली होती ती भावूक झाली होती. कैटी पैरीनं मोहीम यशस्वी होताच बाहेर आल्यानंतर पृथ्वीवरील माती हात घेत अभिवादनं केलं. 



अमेझॉनमधील यशानंतर जेफ बेझोस यांनी 2000 मध्ये ब्लू ओरिजिन मिशन सुरु केलंहोतं. यापूर्वी सान्चेझ आणि बेझोस यांच्या लग्नापूर्वी व्हेनिसमध्ये याचं प्रक्षेप ण झालं होतं. बेझोस देखील नव्या क्रू सोबत लाँचिंग पॅडवर गेल होते. ब्लू ओरिजिननं यासंदर्भातील फोटो एक्स वर शेअर केले आहेत.  


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI