BLA Attacks on Pakistan Military : काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची शक्यता जवळ जवळ साऱ्यांना होती. किंबहुना तमात भारतीयांची तशी ती अपेक्षा अन् तीव्र इच्छा देखील होती. अखेर मंगळवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास व्हायचं तेच झालं.भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली आहे. एकाएक झालेल्या या हल्यात पीओकेमधील (POK) 9 ठिकाणी क्षेपणास्त्रांचा मारा करुन दहशतवादी तळ बेचिराख करण्यात आले. अवघ्या 25 मिनिटांत भारतीय वायूदलाने ही सगळी कामगिरी पार पाडत पाकिस्तानी सैन्याला चपराक लगावली.
दरम्यान, या कृत्याचे देशभरात कौतुक झालं आणि अनेक देशांनी या कारवाईचे समर्थन करत भारताला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे आता पाकिस्तान (Pakistan) पुरता कोंडीत सापडला असताना पाकिस्तानवर आणखीन एक मोठा आघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बलुचिस्तानमध्ये (Balochistan) बलूच विद्रोह्यांनी पाकिस्तानी सैन्यावर (Pakistan Military) पुन्हा हल्ला चढवला आहे. यात सैन्याची गाडी रिमोटने उडवली असून या भीषण स्फोटात अनेकांचा खात्मा झाल्याची माहिती पुढे आली आहे.
गेल्या 24 तासातला दुसरा मोठा हल्ला, पाक सैन्यातील अनेकांचा खात्मा
एकीकडे भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानलगतच्या भागात शिरून आणि पाकिस्तानच्या (Pakistan Army) रडारला पत्ता ही लागून न देता दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केलाय. भारतीय वायूदलाच्या (Indian air Force) या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रचंड धास्तावलंय असताना बलुचिस्तानमध्ये बलूच विद्रोह्यांनी पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा हल्ला चढवलाय. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 7 हून अधिक लोक मारल्या गेल्याचे सांगितलं जातंय.
तर दुसरीकडे गेल्या चोवीस तासांतील हा दुसरा मोठा हल्ला असल्याने पाकिस्तान मोठ्या अडचणीत सापडला आहे. बलूच विद्रोह्यांनी हा हल्ला बोलानमधील माछकुंड येथे केला असून यात सैन्याच्या गाडीला लक्ष्य केलं. बलूच लिबरेशन आर्मीने रिमोटच्या मदतीने गाडी उडवून देत हा हल्ला केलाय. पाकिस्तानी सैन्य एका ऑपरेशनची तयारी करत असतानाच हा हल्ला झाला असल्याचे सांगितले जातंय.
इतर महत्वाच्या बातम्या