Ayatollah Ali Khamenei on Iran Israel Ceasefire: इराण आणि इस्रायलमधील (Iran Vs Israel War) सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेनेही (America) थेट सहभाग घेतल्यानंतर आता या दोन्ही देशातला संघर्ष मिटवण्यासाठी मोठं पाऊल पुढे टाकलं आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युद्धबंदीची (Iran Israel Ceasefire) घोषणा केली आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धानंतर अखेर आता युद्धबंदीची (Iran Israel Ceasefire) घोषणा झालीय. मात्र ट्रम्प यांनी जारी युद्धबंदीचा दावा केला असला तरी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांनी अमेरिकेचा हा दावा फेटाळून लावला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहिले आहे कि, "ज्यांना इराणी लोक आणि त्यांचा इतिहास माहित आहे त्यांना माहित आहे की इराणी राष्ट्र हे शरणागती पत्करणारे राष्ट्र नाही." असे ते म्हणाले आहे. त्यामुळे अद्याप तरी हा वाद निवळला नसल्याचे आता समोर आलं आहे.
रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत रक्षण करण्यास तयार- परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची
दरम्यान, याच मुद्द्यावर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. अशातच इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी धक्कादायक विधान करत या बाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, इस्रायलला त्याच्या कृत्यांसाठी शिक्षा देण्यासाठी आमच्या सशस्त्र दलांची लष्करी कारवाई पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू राहिली. आपल्या प्रिय देशाचे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत रक्षण करण्यास तयार असलेल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या आपल्या शूर सशस्त्र दलांचे आभार मानण्यासाठी मी सर्व इराणी नागरिकांसोबत सामील आहे. असेही ते म्हणाले.
युद्धबंदी फक्त ट्रम्पच करू शकतात- तुलसी गॅबार्ड
अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी युद्धबंदीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की इराण आणि इस्रायलमधील ऐतिहासिक युद्धबंदी फक्त ट्रम्पच करू शकतात. यामुळे आपण शांततेच्या अधिक जवळ जाऊ.
इराण-इस्रायलकडून युद्धबंदीवर अद्याप शिक्कामोर्तब नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदी बाबत घोषणा केली असली तरी यावर दोन्ही देश नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणे अधिक महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संघर्ष विकोपाला गेला असून या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. शिवाय ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे या प्रदेशात स्थिरतेकडे एक मोठे पाऊल उचलले गेले आहे, जरी दोन्ही देशांनी अद्याप यावर एकमत झालेले नाही.
हे ही वाचा