Anurag Bajpayee Luxury Brothel Case:  भारतीय वंशाचे उद्योजक, सुप्रसिद्ध अभियंता आणि ग्रेडिएंट या क्लीन वॉटर स्टार्टअपचे सहसंस्थापक आणि सीईओ अनुराग बाजपेयी हे सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये उघडकीस आलेल्या एका हाय-प्रोफाइल वेश्यालय घोटाळ्यामुळे चर्चेत आले आहेत. हार्वर्ड विद्यालयाजवळील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या या अवैध वेश्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून यामुळे कॉर्पोरेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. 

या घटनेने केवळ तंत्रज्ञान आणि स्टार्टअप जगतालाच धक्का बसला नाही तर अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय समुदायालाही धक्का बसला आहे. एका वृत्तानुसार, बोस्टन न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये ज्यांची नावे समोर आली आहेत अशा 30हून अधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये बाजपेयी यांचा समावेश आहे. सोबतच प्रति तास ($600) (सुमारे 50 हजार रूपये) मोजून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या उच्चभ्रू ग्राहकांमध्ये बाजपेयी यांच्याही नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

घोटाळ्यात 30हून अधिक हाय प्रोफाइल व्यक्तींच्या नावाचा समावेश

न्यू यॉर्क पोस्ट आणि वॉल स्ट्रीट जर्नलने प्रकाशित केलेल्या वृत्तांनुसार, या सेलिब्रिटींवर हार्वर्ड विद्यापीठाजवळील आलिशान अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या एका उच्च दर्जाच्या वेश्यालयात व्यभिचार सेवा (सेक्स सेवा) साठी प्रति तास $600  (सुमारे 50 हजार रूपये)पर्यंत पैसे दिल्याचा आरोप आहे. दरम्यान, नोव्हेंबर 2023 मध्ये जेव्हा अमेरिकन एजन्सींनी या गुप्त वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. त्यावेळी, माजी अमेरिकन वकील जोशुआ लेव्ही म्हणाले होते की, ही टोळी "गोपनीयता आणि विशिष्टता" आधारित अत्यंत श्रीमंत आणि प्रभावशाली क्लायंटना लक्ष्य करणारी एक टोळी होती. हे नेटवर्क केंब्रिज, वॉटरटाउन, डेधम आण इस्ट व्हर्जिनियामधील हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये चालवला जात होता. या सोसायटीमध्ये अनेक हाय प्रोफाइल व्यक्ती येत असल्याची माहिती ही वकील जोशुआ लेव्ही यांनी दिली होती. 

कोण आहेत अनुराग वाजपेयी ?

अनुराग बाजपेयी हे ग्रेडियंटचे सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. ग्रॅडिएंड ही बोस्टन-आधारित कंपनी आहे जी स्वच्छ पाणी, प्रगत पाणी आणि पाण्याच्या कचरा प्रक्रिया उपायांमध्ये विशेषज्ञ आहे.भारतात जन्मलेले बाजपेयी हे क्लीनटेक उद्योगातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून उदयास आले आहेत. २०१३ मध्ये मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून बाहेर पडलेल्या ग्रेडियंटला जागतिक स्तरावर नेता म्हणून स्थापित करण्यात बाजपेयी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीची एकूण संपत्ती 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

हे ही वाचा