मुंबई : जगातील सर्वात मोठं AN -225 Mriya हे कार्गो विमान पहिल्यांदाच भारतात दाखल झालं आहे. युक्रेनच्या अँटोनोव्हो या कंपनीचं हे विमान आहे.


 

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरलं आहे, अशी माहिती युक्रेन कंपनीकडून देण्यात आली आहे.

 

काय आहेत विमानाची वैशिष्ट्ये?

 

  • AN-225 Mriya हे जगातील आतापर्यंत तयार झालेलं सर्वात मोठं विमान आहे.


 

  • हे विमान जवळपास 6 टर्बोफॅन इंजिनवर चालते. तर याचे वजन हे 640 टन एवढे आहे. याची विमानाची लांबी एअरबस A380 पेक्षाही 37 फूट जास्त आहे. AN-225 ची लांबी 276 फूट आहे.


 

  • AN-225 Mriya हे विमान खास मोठ्या मार्गावरील वाहतुकीसाठी तयार करण्यात आलं आहे.


 

  • या विमानात 180 ते 230 टन वजन वाहण्याची क्षमता आहे. सध्या हे विमान तुर्कमेनिस्तानहून हैदराबादला आलं आहे.


 

  • या विमानाचे विंगस्पॅन इतर सर्व विमानांच्या तुलनेत मोठ्या लांबीचे आहेत. विशेष म्हणजे एवढ्या बलाढ्य वजनाचे विमान 850 किमी प्रति तास कमाल वेगाने उडते.