Donald Trump Attack : वॉशिंग्टन डीसी येथे 'व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशन'च्या डिनर कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या उपस्थितीत झालेल्या गोळीबाराचीघटनाताजीअसताना व्हाइट हाऊसजवळ (Washington Shooting) पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडलीय. शनिवारी संध्याकाळी व्हाइट हाऊसच्या  (White House)  नॉर्थ लॉनजवळ गोळीबार झाल्याची मोठी घटना घडली. यात सुमारे 20 ते 30 गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकू आले. ही घटना 17th Street आणि परिसरात घडली. दरम्यानयाघटनेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित आहे. मात्रपुन्हाएकदाघडलेल्यायाघटनेनंअमेरिकाहादरलंअसून राष्ट्राध्यक्षाच्या (Donald Trump)  सुरक्षेचाप्रश्नऐरणीवरआलाआहे.

Continues below advertisement

Washington Shooting : सुमारे 20 ते 30 गोळ्या झाडल्याचा मोठा आवाज, FBI च्या पथकाकडून तपास सुरु

मिळालेल्यामाहितीनुसार, सीक्रेट सर्व्हिसने तातडीने परिसर सील केला. मीडिया सदस्यांना व्हाइट हाऊसच्या ब्रिफिंग रूममध्ये आश्रय दिला. काउंटर-स्नायपर्स छतावर तैनात करण्यात आले आणि संपूर्ण कॉम्प्लेक्स लॉकडाउन करण्यात आलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यावेळी व्हाइट हाऊसच्या आत होते आणि ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. घटनेचीमाहितीमिळताच FBI पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. सीक्रेट सर्व्हिस आणि FBI संयुक्तपणे काम करत आहेत. यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, ईस्टर्न टाईमनुसार सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास, संशयित एका सुरक्षा तपासणी नाक्याजवळ आला, त्याने आपल्या बॅकपॅकमधून शस्त्र बाहेर काढले आणि तेथे तैनात असलेल्या अधिकाऱ्यांवर गोळीबार केला. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अंदाजे 30 गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. दरम्यान एप्रिलमध्ये झालेल्या पत्रकार डिनर दरम्यानच्या गोळीबारानंतरची दुसरी प्रमुख घटना असूनआता FBI च्या पथकाकडूनकसूनतपाससुरुकरण्यातआलाआहे.

Continues below advertisement

Donald Trump Attack : गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचाउपचारदरम्यानमृत्यू

यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या कम्युनिकेशन ऑफिसने ट्विट केले, "शनिवारी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर थोड्याच वेळात, एका व्यक्तीने आपल्या बॅकपॅकमधून शस्त्र काढून 17 व्या स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यूच्या परिसरात गोळीबार केला. सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला आणि संशयिताला गोळ्या घातल्या. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या गोळीबारात एक नागरिही जखमी झाला.

US Police : प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोळीबार

सिक्रेट सर्व्हिसने कळवले की, अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला आणि संशयिताला गोळ्या घातल्या. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याचानंतर मृत्यू झाला. या घटनेत एक नागरिकही जखमी झाला. किंबहुना, याबाबतएका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्या नागरिकाला संशयिताने गोळी मारली की प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिक्रेट सर्व्हिसने कळवले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये होते, परंतु या घटनेचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. एजन्सीने असेही सांगितले की, त्यांचा कोणताही कर्मचारी जखमी झाला नाही. अधिकारी जखमी झाला नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर