Continues below advertisement

Donald Trump न्यूयॉर्क: अमेरिकेमधील 19 राज्यांनी देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा फी वाढीच्या निर्णयाला विरोध केला आहे. 19 राज्यांनी H-1B व्हिसा फी वाढी विरोधात कोर्टात धाव खेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी H-1B व्हिसाची फी 1000 अमेरिकन डॉलर्सवरुन 1 लाख अमेरिकन डॉलर्स केली होती. 19 राज्यांनी ट्रम्प यांनी केलेली H-1B व्हिसा फी वाढ बेकायदेशीर असल्याचा दावा केला. यामुळं ज्या कंपन्या कुशल विदेशी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहेत त्यांच्यावर बंधनं येत असल्याचा दावा केला. द इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार कॅलिफोर्निया आणि मॅसेच्युसेट्स या राज्यांनी शुक्रवारी यूएस डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर द डिस्ट्रिक्ट ऑफ मॅसेच्युसेट्स मध्ये याचिका दाखल केली.

H-1B व्हिसा फी वाढीला 19 राज्यांचा विरोध

H-1B व्हिसा फी वाढीमुळं कंपन्या आणि प्रामुख्यानं सार्वजनिक क्षेत्र प्रामुख्यानं शिक्षण, आरोग्य क्षेत्रावरील आर्थिक दडपण वाढू शकतं. ट्रम्प प्रशासनानं कोणतं ही कारण न देता आणि क्राँग्रेसनं दिलेल्या अधिकारांच्या कक्षेबाहेर जात H-1B व्हिसा फी वाढीचा निर्णय घेतल्याचा दावा या राज्यांनी केला. H-1B व्हिसा फी वाढीला यापूर्वी यूएस चेंबर ऑफ कॉमर्स, यूनियन्स अँड अ ग्लोबल स्टाफिंग एजन्सीनं आव्हानं दिलं आहे. अमेरिकन राज्यांनी H-1B व्हिसा फी वाढीला आव्हान देण्याची पहिली वेळ आहे.

Continues below advertisement

एकीकडे 19 राज्य H-1B व्हिसा फी वाढीच्या विरोधात गेली असली तर व्हाईट हाऊसनं फी वाढीचं समर्थन केलं आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते टेलर रॉजर्स यांनी फी कायदेशीर असून एच वन बी प्रोग्रॅमच्या व्यापक सुधारणांचा भाग असल्याचं म्हटलं. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचं आश्वासनं दिलं आहे. अमेरिकन कंपन्यांनी जगभरातून उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण कर्मचारी आणावेत यासाठी एचवनबी व्हिसाती दुरुस्ती आवश्यक असल्याचं म्हटलं.

H-1B व्हिसा प्रोग्राम अमेरिकेमधील कंपन्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात विदेशी कर्मचाऱ्यांना विशेष पदांवर नोकरी देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. अमेझॉन, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि एपल H-1B व्हिसाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. 19 राज्यांनी व्हिसा फी वाढीमुळं सार्वजनिक संस्थांनी आवश्यक सेवांमध्ये बाधा येऊ शकते, असं म्हटलं. न्यूयॉकच्या महाअधिवक्ता लेटिटिया जेम्स यांनी यामुळं राज्याच्या कामकाजावर परिणाम होईल असं म्हटलं. न्यूयॉर्कच्या आरोग्य सेवेवर परिणाम होईल, लहान मुलांच्या शिक्षणात अडथळे येतील, आमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असंही त्यांनी म्हटलं.

कोणत्या राज्यांचा विरोध?

कॅलिफोर्निया, मॅसेच्युसेट्स, अरिझोना, कोलोरॅडो, कनेक्टिकट, डेलावेर, हवाई, इलिनॉय, मेरिलँड, मिशिगन, मिनेसोटा, नॉर्थ कॅरोलविना, न्यू जर्सी, ओरेगॉन,ऱ्होड आयलँड,व्हरमाँट, विस्कॉन्सिन आणि वॉशिंग्टन या राज्यांनी विरोध केला आहे.