America Donald Trump : अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याचीघटनाघडलीआहे. दरम्यान, याठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखीलउपस्थितअसतानाहिघटनाघडलीआहे. शनिवारी रात्री (26 एप्रिल, 2026) मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) आणि मेलानिया ट्रम्प (Melania Trump) यांनी व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. तरयावेळीसंशयित हल्लेखोराला गोळ्या घालून ठारकरण्यातआल्याचीहीमाहितीआहे. तरयावेळीसंशयित संशयित हल्लेखोराला अटककरण्यातआलीअसूनत्यात्यादिशेनेहीअधिकतपासकेलाजातआहे. मात्रयाघटनेनेमोठीखळबळउडालीअसून राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. (Donald Trump News)

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया ट्रम्प आणि इतर वरिष्ठ नेत्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सोशल मीडियावर काही व्हिडिओंमध्ये मोठे आवाज ऐकू आल्याचा दावा करण्यात आला होता, किंबहुना या व्हिडिओंची सत्यता अद्याप पडताळलीगेलेली नाही. एका वृत्तानुसार, या आवाजानंतर उपस्थितांना बाहेर काढण्यात आले आणि परिसर सील करण्यात आला आहे.

Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प यांच्या समक्ष गोळीबार, पत्नी मेलानियाही होत्या सोबत

दरम्यान, एएफपी (AFP) या वृत्तसंस्थेनुसार, या घटनेनंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. किंबहुना, तो आवाज नेमका कशामुळे आला, तो गोळीबाराचा होता की आणखी कशाचा, तरआरोपीनेमकाकोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या तपास सुरू असून, सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच लावलीहोती या कार्यक्रमाला हजेरी

दरम्यान, सीएनएन (CNN) नुसार, मेलानिया ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स हे ट्रम्प यांच्यासोबत मुख्य टेबलवर उपस्थित होते. अनेक कॅबिनेट मंत्री आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. प्रशासनातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, कॅबिनेटमधील कोणत्याही सदस्याला इजा झालेली नाही. हाजेवणाचाकार्यक्रम विशेष होता, कारण राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी या कार्यक्रमाला पहिल्यांदाच हजेरी लावली होती. हा एक असा कार्यक्रम आहे जिथे सामान्यतः मीडिया, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येतात, परंतु ट्रम्प आणि मीडिया यांच्यातील दीर्घकाळापासूनच्या तणावपूर्ण संबंधांमुळे हा कार्यक्रम आधीच चर्चेत होता.

हे सुद्धा वाचा:

Iran War Live Update: इराणच्या खांद्यावरून अमेरिकेनं आता चीनकडे मोर्चा वळवला! रशिया संतापला, भारताची सुद्धा चिंता वाढली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडींनी लक्ष वेधलं!