US attacks on Iran: इराणनं जिथे अण्वस्त्रे तयार केलीत, तिथेच अमेरिकन लष्कराच्या विमानांनी हल्ला केला? धक्कादायक माहिती आली समोर
US Attacks Iran Nuclear Sites : इराणमधील तीन प्रमुख आण्विक तळांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांबद्दल धक्कादायक गुप्तचर माहिती आता समोर येत आहे.

US Attacks Iran Nuclear Sites : इराणमधील तीन प्रमुख आण्विक तळांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांबद्दल धक्कादायक गुप्तचर माहिती आता समोर येत आहे. रविवारी सकाळी (22 जून 2025) ज्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले त्यात फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान यांचा समावेश होता. दरम्यान, ही सर्व इराणच्या अणुकार्यक्रमाची महत्त्वाची केंद्रे मानली जात असल्याचे बोललं जात आहे. फोर्डो आणि नॅटान्झ अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये युरेनियम समृद्धीकरण (Enrichment) करण्यात आले. युरेनियम समृद्धीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे अण्वस्त्रांसाठी आवश्यक असलेली सामग्री तयार केली जाते. त्याच वेळी, इस्फहान येथे युरेनियम साठवले गेले होतं. अशातच आता असे देखील मानले जात आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युरेनियम सुरक्षितपणे साठवले गेलं होतं.
फोर्डो प्लांट जमिनीपासून सुमारे 90 मीटर खाली
फोर्डो प्लांट जमिनीपासून सुमारे 90 मीटर खाली आहे, ज्यामुळे तो सर्वात सुरक्षित खोल समुद्रातील अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक मानलो जातो. या कारणास्तव, हे ठिकाण आतापर्यंत इस्रायली हल्ल्यांच्या आवाक्याबाहेर राहिले होते. मात्र अमेरिकेने नेमका येथे हल्ला करण्यासाठी त्यांचे सर्वात प्रगत विमान बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स वापरले. जे खोल आणि सुरक्षित लक्ष्यांना देखील यशस्वीरित्या लक्ष्य करू शकतात. या विमानांमधून इराणच्या आण्विक तळांवर मासिव्ह ऑर्डिनेस एअर ब्लास्ट श्रेणीत मोडणारे GBU-57A/B बाँब (MOAB bomb) टाकण्यात आले. अगदी जमिनीच्या आत खोलवर नुकसान करण्याची क्षमता असलेली ही स्फोटकं 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' म्हणून ओळखली जातात. अलीकडच्या काळात अशाप्रकारच्या संहारक शस्त्रांचा वापर क्वचितच केला जातो. त्यामुळे अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर हे संहारक बॉम्ब का टाकले, याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.
खतरनाक 'मदर ऑफ ऑल बॉम्ब'चा वापर, नेमकं काय घडलं?
1) इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून 'B-2 स्टील्थ बॉम्बर'चा वापर करण्यात आला.
2) 'B-2 स्टील्थ बॉम्बर' रडारच्या नजरेत येत नाही.
3) 18 हजार किलो वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
4) 61 मीटरपर्यंत खोल जाऊन मारा करण्याचीही त्याची क्षमता आहे.
5) B-2 लढाऊ विमानातून GBU-57A/B प्रकाराचे तीन बाँब टाकले असल्याची माहिती समोर आली आहे.
6) GBU-57A/B बाँबला MOAB अर्थात मॅसिव ऑर्डिनेस एअर ब्लास्टही म्हणतात
7) GBU-57A/B बाँबला मदर ऑफ ऑल बाँब अर्थात MOAB असंही म्हणतात.
8) हिंदी महासागरातल्या गुआम एअरबेसवरुन तैनात होते B-2 लढाऊ विमानं.
9) काल(21 जून) अमेरिकेकडून गुआमवर सहा B-2 लढाऊ विमानं तैनात
इतर महत्वाच्या बातम्या























