एक्स्प्लोर

US attacks on Iran: हवेतच इंधन भरत सतत 37 तास उड्डाण; अमेरिकेच्या 6 बी-2 बॉम्बर्सनी इराणच्या आण्विक तळांवरती कसा केला हल्ला?

अमेरिका आणि इराणमधील सुरू असलेल्या तणावाने रविवारी सकाळी आणखी एक धोकादायक वळण घेतले. अमेरिकेच्या अत्याधुनिक 6 बी-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्सनी इराणच्या तीन प्रमुख अणु तळांवर भयंकर हल्ला केलाय.

US Attacks Iran Nuclear Sites : सतत 37 तास आकाशात उडणे, हवेत अनेक वेळा इंधन भरणे आणि नंतर शत्रू देशाच्या सर्वात सुरक्षित आण्विक तळांवर अचूक हल्ला करणे. ही काल्पनिक कथा नव्हती तर अमेरिकेची खरी लष्करी कारवाई होती. ज्याने रविवारी सकाळी संपूर्ण जगाला धक्का दिला. अमेरिका आणि इराणमधील सुरू असलेल्या तणावाने रविवारी सकाळी आणखी एक धोकादायक वळण घेतले. खरं तर, अमेरिकेच्या अत्याधुनिक 6 बी-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्सनी इराणच्या तीन प्रमुख अणु तळांवर फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर भयंकर हल्ला केला.

हवेतच इंधन भरत सतत 37 तास उड्डाण

मिज़ूरी (USA) येथून उड्डाण केल्यानंतर, या 6 बी-2 बॉम्बर्सनी जमिनीवर न उतरता सुमारे 37 तास सतत उड्डाण केले. या काळात, त्यांनी हवेत अनेक वेळा इंधनही भरलं. जेणेकरून मिशन न थांबता ते पूर्ण करता येईल. अशा ऑपरेशन्सना लांब पल्ल्याच्या हल्ल्यांचे एक टोकाचे उदाहरण मानले जातं.

एका बंकर बस्टरने उडवून दिला सर्वात सुरक्षित आण्विक तळ 

इराणचा फोर्डो अणु केंद्र, जो डोंगराखाली खोलवर बांधला गेला होता आणि अत्यंत सुरक्षित मानला जात होता, तो या हल्ल्यात सर्वात मोठा लक्ष्य बनला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, 'Fordow is gone' म्हणजेच,'फोर्डो आता राहिलेलं नाही' हा हल्ला विशेष GBU-57 'मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर' बंकर बस्टर बॉम्बने करण्यात आला, जे विशेषतः अशा खोल आणि बचावात्मक लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी बनवले जातात.

बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा एकाच वेळी वापर

या संपूर्ण कारवाईत, अमेरिकेने फोर्डोवर 6 बंकर बस्टर बॉम्ब टाकले, तर नतान्झ आणि इस्फहान सारख्या इतर अणुस्थळांवर सुमारे 30  टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. गेल्या काही वर्षांत अमेरिकेने इराणवर केलेला हा सर्वात थेट आणि शक्तिशाली हल्ला होता. फोर्डो प्लांट जमिनीपासून सुमारे 90 मीटर खाली आहे, ज्यामुळे तो सर्वात सुरक्षित खोल समुद्रातील अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक मानलो जातो. या कारणास्तव, हे ठिकाण आतापर्यंत इस्रायली हल्ल्यांच्या आवाक्याबाहेर राहिले होते. मात्र अमेरिकेने नेमका येथे हल्ला करण्यासाठी त्यांचे सर्वात प्रगत विमान बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स वापरले. जे खोल आणि सुरक्षित लक्ष्यांना देखील यशस्वीरित्या लक्ष्य करू शकतात. या विमानांमधून इराणच्या आण्विक तळांवर मासिव्ह ऑर्डिनेस एअर ब्लास्ट श्रेणीत मोडणारे GBU-57A/B बाँब (MOAB bomb) टाकण्यात आले. अगदी जमिनीच्या आत खोलवर नुकसान करण्याची क्षमता असलेली ही स्फोटकं 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' म्हणून ओळखली जातात. अलीकडच्या काळात अशाप्रकारच्या संहारक शस्त्रांचा वापर क्वचितच केला जातो. त्यामुळे अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर हे संहारक बॉम्ब का टाकले, याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

तो भूकंप नव्हता तर अणुबॉम्बचा स्फोट होता? अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वीच इराणने न्युक्लिअर टेस्ट आटोपल्याच्या चर्चांना उधाण

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Embed widget