Ali Khamenei Death: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei Death) यांचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत विविध दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आता ब्रिटिश मीडियाने या संदर्भात एक मोठा दावा केलेला आहे. खामेनी यांच्यावर इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा अनेक वर्षांपासून करडी नजर ठेवून होती. त्यासाठी तेहरानमधील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेरा हॅक करण्यात आला होता. प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौकातील स्थितीवर इस्रायलचे लक्ष होते. तसेच तेहरानसह इराणच्या मोबाईल नेटवर्कमध्ये देखील इस्रायलने शिरकाव केलेला होता. त्यामुळे खामेनी, त्यांचे सहकारी आणि विविध अधिकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालीवर इस्रायलचा वॉच असल्याचा दावा ब्रिटिश मीडियाने केलाय.
Ali Khamenei Death: ऑपरेशन कसे राबवले गेले?
हे ऑपरेशन काही दिवसांचे नव्हते, तर दीर्घकालीन ऑपरेशन होते. इस्रायलची गुप्तचर युनिट Unit 8200 आणि Mossad यांनी तांत्रिक प्रणालीमध्ये खोलवर घुसखोरी केली. कॅमेऱ्यांच्या लाईव्ह फीडला प्रवेश मिळवण्यात आला. त्यासोबतच मोबाइल नेटवर्क डेटा देखील जोडण्यात आला.
यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हालचालींचे विश्लेषण शक्य झाले. बॉडीगार्ड्स कुठे गाड्या उभ्या करतात, गार्डची अदलाबदल कोणत्या वेळी होते, कोणत्या मार्गाने हालचाल होते. हळूहळू ‘पॅटर्न ऑफ लाइफ’ तयार करण्यात आला.
Ali Khamenei Death: कॅमेरे कसे बनले ‘हत्यार’?
आज शहरांमध्ये बसवलेले CCTV कॅमेरे फक्त वाहतूक नियंत्रणासाठी नसतात. जर कोणी प्रणालीमध्ये शिरकाव केला, तर तेच कॅमेरे निरीक्षणाचे शक्तिशाली साधन बनू शकतात. अहवालानुसार, फुटेज थेट बाहेरील सर्व्हरवर पाठवले जात होते. म्हणजेच डेटा शहराच्या अंतर्गत प्रणालीपुरता मर्यादित राहिला नव्हता. मोबाइल नेटवर्कमध्ये घुसखोरीमुळे कोणता फोन कोणत्या ठिकाणी आहे, याची माहिती मिळू शकते. त्यामुळे सुरक्षा हालचालींचे चित्र अधिक स्पष्ट होत गेले.
Ali Khamenei Death: इस्रायलने अचूक कारवाईची योजना आखली
ब्रिटीश मिडीयाच्या दाव्यानुसार, पुरेशी माहिती जमा झाल्यानंतर अचूक कारवाईची योजना आखण्यात आली. स्थान, वेळ आणि सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा ओळखून पुढील रणनीती ठरवली गेली. यानंतर शनिवारी (28 फेब्रुवारी 2026) इस्त्रायलने अमेरिकेसोबत केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
