Afghanistan Earthquake Update: अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भीषण भूकंप झाला असून रविवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागात सहा रिश्टर तीव्रतेचा भीषण भूकंप झाला. यतिव्र भूकंपात आत्तापर्यंत 800 लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर 2500 लोक गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपात अनेकांची घरे कोसळली असून ढिगार्यां खालून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून शोध घेतला जात आहे.
मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान
अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11:47 वाजता हा भूकंप झाला. नांगरहार प्रांतातील जलाला बाद पासून 27 किलोमीटर ईशान्येला असणार हे भूकंपाचे केंद्र उध्वस्त झाले आहे. फक्त आठ किलोमीटर खोलीपर्यंत झालेल्या भूकंपामुळे कुणाल प्रांतात मोठी हानी झाली. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालं असून शेकडो घरांचं नुकसान झालं आहे.
भूकंपात झालेल्या नुकसानीच्या माहितीनुसार, एकाच गावात 30 जण मृत्युमुखी पडल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. विखुरलेल्या वस्त्यांमध्ये झालेल्या नुकसानाची अचूक आकडेवारी गोळा करण्यासाठी अजून वेळ लागणार असल्यासही अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणं आहे. मृतांची आणि जखमींची संख्या ही मोठी आहे. या भागात पोहोचणे अवघड असल्याने बचाव पथकाच्या टीम अजूनही घटनास्थळी आहेत. असे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शाराफत जमान यांनी त्यांच्या निवेदनात सांगितले.
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
शेकडो जखमी लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. कमी प्रमाणात रस्ते असणाऱ्या दुर्गम भागातून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पाकिस्तान मधील खैबर पक्खतून खाच्या सीमेला लागून असलेल्या भागात मध्यरात्री सुमारे दहा किलोमीटर खोलीवर झालेला भूकंपानंतर अनेक घर जमीन दोस्त झाली आहेत .या भागात अनेक बचाव पथकेही काम करत आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले .अफगाणिस्तानात कायम भूकंप होतात .विशेषतः हिंदू कुश पर्वतरांगांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे .इंडियन आणि युरेशियन टेक्निक प्लेट्स या भागात एकमेकांना मिळतात .गेल्या वर्षी अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडे ओळीने झालेल्या भूकंपांमुळे 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता
मैदान शहरच्या माजी महापौर झरिफा घफ्फारी यांनी सोशल मीडियावर म्हटले की, “कुनर, नंगरहार आणि नुरिस्तान प्रांतांमध्ये संपूर्ण गावे जमीनदोस्त झाली आहेत. महिला, मुले, आणि वृद्ध यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. तालिबान सरकारकडून योग्य मदत मिळत नसल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरित मदतीसाठी पुढे यावे.”सुरुवातीला मृतांचा आकडा कमी असल्याचे सांगितले जात होते, पण Anadolu एजन्सीने अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले की, 250 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 500 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. कुनर प्रांताला सर्वाधिक फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.