UPDATE : इक्वेडोरमधील भूकंपाच्या बळींचा आकडा 200 च्या पार गेला आहे. मात्र त्सुनामीचा धोका टळल्याची माहिती राष्ट्राध्यक्षांनी दिली आहे.
वॉशिंग्टन : दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर भूकंपच्या धक्क्याने हादरलं. पश्चिम समुद्रकिनाऱ्याजवळ आलेल्या 7.8 रिश्टर स्केल क्षमतेच्या शक्तीशाली भूकंपामुळे आतापर्यंत 41 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
उपराष्ट्रपती जॉर्ज ग्लेस यांच्या माहितीनुसार, आजूबाजूच्या सहा शहरांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. शिवाय बचावकार्यासाठी नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले आहेत. तर भूकंपामुळे प्रचंड नुकसान झालं आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
भूकंपाचं केंद्र आग्नेय समुद्रकिनाऱ्यावरील मुईज्नेजवळ होतं. भूकंपानंतर परिसरातील घरांची छप्परं तुटली आणि एक उड्डाणपूलही कोसळला.
भूकंपाच्या केंद्राच्या 300 किमी क्षेत्रातील समुद्रकिनाऱ्याजवळच्या परिसरात उंच लाटांची शक्यता आहे, असं पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने सांगितलं.