Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर..आजपासून ऑक्टोबरचा नवा आठवडा गेमचेंजर! पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 5 To 11 October 2026: आजपासून ऑक्टोबरचा नवा आठवडा सुरू झाला आहे, या आठवड्यात कोणाचं भाग्य बदलेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज आपण तूळ ते मीन राशींचं साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया..

Weekly Horoscope 5 To 11 October 2026: ऑक्टोबरचा (October 2026) पहिला आठवडा आजपासून सुरु झाला आहे. 5 ते 11 ऑक्टोबर 2026 असा हा आठवडा असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या आठवड्यात पितृपक्ष आणि ग्रहांचे दुर्मिळ योग होत आहेत. त्यामुळे या आठवड्यात काहींचं भाग्य उजळणार आहे तर काहींसाठी हा आठवडा आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे हा आठवडा कोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज आपण तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी 5 ते 11 ऑक्टोबर हा नवा आठवडा तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. जोडीदारासोबत एखादा महत्त्वाचा विषय चर्चेतून मार्गी लागू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी या आठवड्यात काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरी किंवा व्यवसायात अचानक एखादी चांगली संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत, मात्र अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल. कुटुंबातील व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. शांतपणे घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नव्या आठवडा नवीन योजना आणि उपक्रमांसाठी अनुकूल आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा कामाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे योग असले तरी मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. प्रवासाचा योगही संभवतो. आत्मविश्वास वाढेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील..
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नव्या आठवड्यात जबाबदाऱ्या वाढतील, मात्र त्यातून तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधीही मिळेल. कामाच्या ठिकाणी एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. पैशांच्या बाबतीत परिस्थिती स्थिर राहील. जुनी आर्थिक अडचण दूर होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. वैवाहिक जीवनात समंजसपणा ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. तुमच्या कल्पनांना योग्य प्रतिसाद मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून बचतीकडे लक्ष देणे फायदेशीर ठरेल. मित्र किंवा सहकाऱ्यांकडून महत्त्वाची मदत मिळू शकते. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल घडतील. मात्र भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी या आठवड्यात तुमच्या मेहनतीला चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाची संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, मात्र अचानक येणाऱ्या खर्चामुळे बजेट बिघडणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात जवळीक वाढेल. मनातील संभ्रम दूर होऊन एखाद्या महत्त्वाच्या विषयावर योग्य निर्णय घेता येईल.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आजपासून ऑक्टोबरचा नवा आठवडा नशीब पालटणार! 5 राशींची पाचही बोटं तुपात, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Before You Go
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
महत्त्वाच्या बातम्या




















