Weekly Horoscope: धनु, मकर राशीसाठी पुढचे 7 दिवस पैसा असेल हाती; अविवाहितांचे लग्न ठरेल, जबाबदाऱ्या मिळतील, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 4 To 10 August 2025: तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 4 To 10 August 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसाार, ऑगस्ट महिन्याचा नवा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु आणि मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - धनु राशीसाठी प्रेमींसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या आनंददायी राहील. या आठवड्यात मित्रांना भेटण्याची आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची शक्यता आहे.
करिअर (Career) - धनु राशीसाठी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा मजबूत होईल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रकल्प किंवा संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
आरोग्य (Health) - या आठवड्यात मानसिक ताण कमी होईल. श्वासोच्छवासाच्या किंवा त्वचेशी संबंधित समस्या असू शकतात. डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग आणि ध्यान केल्याने ऊर्जा वाढेल.
मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये पारदर्शकता राहील, ज्यामुळे नातेसंबंध मजबूत होतील.
करिअर (Career) - या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात होण्याचे संकेत आहेत. रखडलेला प्रकल्प पुन्हा गती मिळवू शकतो. तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांना नवीन करार किंवा भागीदारी करण्यासाठी हा काळ अनुकूल असेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक पावले उचला, अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे. सावधगिरी बाळगा.
आरोग्य (Health) - या आठवड्यात मानसिक ताण येऊ शकतो, ध्यान आणि योग आराम देईल. आरोग्याबाबत कोणतीही मोठी चिंता नाही, परंतु डोकेदुखी किंवा पोटाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. खाण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणा टाळा.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Signs 4 to 10 August 2025: पुढचे 7 दिवस अद्भूत! पॉवरफुल बुधादित्य योग बनतोय, 'या' 5 राशींच्या संपत्तीत भरभराट होणार, सुखाचा आठवडा..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
























