Weekly Horoscope 30 June To 06 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)


लव्ह लाईफ (Love Life) - कुंभ राशीच्या लोकांचे रोमॅंटिक जीवन फार सुरळीत चालेल. सिंगल लोकांची खास व्यक्तीबरोबर भेट होईल. तसेच, पार्टनरबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची देखील सुरुवात करु शकता.  


करिअर (Career) - नवीन आठवड्यात तुम्ही इतरांच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात व्यस्त असाल. जे तरुण नवी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली आणि मनासारखी नोकरी मिळेल.  


आर्थिक स्थिती (Wealth) - सेविंग्स आणि गुंतवणूक करताना थोडी काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी पैशांचा फार जपून वापर करणं गरजेचं आहे.  हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत काही संघर्ष आणेल, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर परिस्थिती अनुकूल कराल.


आरोग्य (Health) -  शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. योग आणि ध्यान केल्याने आराम मिळेल.


मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)


कौटुंबिक जीवन (Family) - नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ठेवा. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल.


करिअर (Career) - हा आठवडा  नोकरीत स्थिरता राहील आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते.


आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, हा आठवडा तुमच्यासाठी नवीन शक्यता आणि प्रगती दर्शवणारा आहे. जुन्या कामात यश मिळू शकते


आरोग्य (Health) - या आठवड्यात पोटाशी संबंधित समस्या असू शकतात, त्यामुळे आहाराची काळजी घ्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                                         


Lucky Zodiac Signs : 29 जूनला 'या' राशींवर असणार सूर्यदेवाची कृपा; नशिबाचे दरवाजे उघडणार, नवीन नोकरीची संधी?