Maharashtra Weather Today: दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातही पावसाची शक्यता; देशभरात अचानक हवामान बदलले
Maharashtra Weather Today: दिल्ली-एनसीआरच्या हवामानात अचानक बदल झाले असून अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे.

Maharashtra Weather Today: दिल्ली-एनसीआरच्या हवामानात अचानक बदल झाले असून अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. पावसामुळे दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
हवामान खात्याने पुढील 2 तासांत दिल्ली-एनसीआर, यमुनानगर, कर्नाल, सफिदोन, पानीपत, सोहाना, पलवल, नूह, औरंगाबाद, होडल (हरियाणा), गंगोह, शामली, कांधला, नांदगाव, बरसाणा, राया, हाथरस, मथुरा, सादाबाद, आग्रा, जाजाऊ (उत्तर प्रदेश), भिवाडी, डीग, भरतपूर (राजस्थान) येथे अनेक ठिकाणी 40-90 किमी/ताशी जोरदार वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
#WATCH | Delhi: Rain showers lashed parts of the national capital; heavy waterlogging witnessed in several areas.
— ANI (@ANI) May 2, 2025
(Visuals from Dwarka underpass area) pic.twitter.com/eKJCfoe2xm
1 मे च्या रात्रीपासून हवामान बदलण्यास सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. 2 मे ते 4 मे दरम्यान जोरदार वाऱ्यांसह हलका पाऊस पडेल. पुढील दोन दिवसांतही सतत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या काळात जोरदार वारे वाहतील. काही ठिकाणी वादळ आणि गडगडाटाचा सामना करावा लागू शकतो, असं हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांतही सतत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या काळात जोरदार वारे वाहतील. काही ठिकाणी वादळ आणि गडगडाटाचा सामना करावा लागू शकतो, असं हवामान विभागाने सांगितले आहे.
#WATCH | Heavy rainfall in Delhi leaves parts of the city waterlogged. Visuals from ITO. pic.twitter.com/p1aG2dIyCC
— ANI (@ANI) May 2, 2025
जयपूरसह राजस्थानातील अनेक शहरांमध्ये पाऊस-
राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान बदलले आहे. जैसलमेर, जोधपूर, भीलवाडा, पाली, नागौर, बिकानेर, उदयपूर, कोटासह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. अनेक जिल्ह्यांमध्ये वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहत होते, तर काही भागात हा वेग ताशी 60 किलोमीटर होता. जैसलमेर आणि बिकानेरमध्येही गारपीट झाली. पावसामुळे तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे.
उत्तर प्रदेशातही पडला पाऊस-
उत्तर प्रदेशात हवामान पूर्णपणे बदलले आहे. आजच्या सकाळची सुरुवात उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये जोरदार वादळाने झाली. नोएडामध्येही सकाळी हवामान बदलले. जोरदार धुळीचे वादळ सुरू झाले. जोरदार धुळीच्या वादळामुळे अनेक घरांच्या काचा तुटून पडल्या. शहरात अनेक ठिकाणी वीज गेली. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने तापमानात घट झाली.
महाराष्ट्रतही पाऊस बरसणार?
सध्या राजस्थानच्या पूर्व भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, त्यापासून केरळपर्यंत जाणारी हवेच्या कमी दाबाची रेषा निर्माण झाली आहे. ही रेषा विदर्भातून जाते. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत. शिवाय स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होऊन, पुढील चार दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे.

























