महाड दुर्घटनेला आम्ही जबाबदार, 180 दिवसात पूल उभारणार : गडकरी
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 06 Aug 2016 08:40 AM (IST)
नवी मुंबई : महाडमध्ये घडलेली दुर्घटना ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे, अशी कबुली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नवी मुंबईत एका कार्यक्रमावेळी बोलत होते. महाडमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेला पूल हा येत्या ६ महिन्यात नव्यानं बांधला जाईल, तसंच मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं कामंही येत्या २ वर्षात पूर्ण होईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. यावेळी नितीन गडकरी म्हणाले,"महाडची घटना ही सरकार म्हणून आमची जबाबदारी. मात्र इथे 180 दिवसात नवा पूल बांधणार. त्यासाठी केंद्र सरकारने मदत केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे 4 लेनचे काम डिसेंबरपर्यंत वेगाने सुरू होईल. येत्या दोन वर्षात हा मार्ग पूर्ण करणार. यासाठी लोकांनी लवकर जमिनी द्याव्या". आघाडी सरकारने गोंधळ घातला, काम लवकर केले नाही. तसेच जमीन संपादन समस्या असल्याने मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण रखडल्याचं गडकरी म्हणाले. संबंधित बातम्या