एक्स्प्लोर

Washim News : धक्कादायक! अपेंडिक्सच्या ऑपरेशनदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली; वाशिमच्या सरकारी रुग्णालयातील प्रकार

Washim News : वाशिमच्या सरकारी रुग्णालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका रुग्णाच्या अपेंडिक्सच्या ऑपरेशनदरम्यान रुग्णाच्या पोटाची चक्क त्वचा भाजल्याचा प्रकार समोर आला आहे.

Washim News : वाशिमच्या सरकारी रुग्णालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका रुग्णाच्या अपेंडिक्सच्या ऑपरेशनदरम्यान रुग्णाच्या पोटाची चक्क त्वचा भाजल्याचा प्रकार समोर आला आहे. वाशिम जिल्हा रुग्णालयात 19 मे रोजी अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेवेळी रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांच्या पोटावर भाजल्याचे घाव पाहिले, तेव्हा त्यांनी तत्काळ डॉक्टरांकडे याची चौकशी केली. डॉक्टरांनी या घटनेमागे 'तांत्रिक बिघाड' असल्याचे सांगत ती अनावधानाने घटना घडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 कुटुंबीयांकडून दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी 

पुढे आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संबंधित तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील कार्यपद्धती, तांत्रिक उपकरणांची स्थिती आणि शस्त्रक्रियेतील सुरक्षा इत्यादि उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. परिणामी, रुग्णाच्या कुटुंबीयांनी दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नसले तरी या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटात राहिला कापडी तुकडा! वाशिम जिल्ह्यातील डॉक्टरांचा प्रताप

संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात एका महिलेची शस्त्रक्रिया करून पोटात गॉज पीस म्हणजेच कापडाचा तुकडा काढण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे एका खाजगी रुग्णालयात प्रसूती दरम्यान राहिल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली असून सुरेखा गणेश काबरा असे पोटातून कपडा काढलेल्या महिला रुग्णाचे नाव आहे. सुरेखा यांची 10 मे रोजी रिसोड येथील एका रुग्णालयात सिजेरियन प्रसूती झाली. त्यानंतर सुरेखा यांचे नेहमी पोट दुखत असल्याने वाशीम येथे सोनोग्राफी करून त्यांचा रिपोर्ट सिझेरियन प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांना दाखविला. तेव्हा त्या डॉक्टरांनी मूत्राशयाचा आजार असल्याचे सांगून उपचार घेण्यास सांगितले. मात्र त्यानंतरही पोट दुखतच राहिले. अखेर सुरेखा यांनी छत्रपती संभाजी नगरातील एका खाजगी रुग्णालयात दाखवले, तेव्हा तपासणी अंतिम सुरेखा यांच्या पोटात गॉज पीस असल्याचे निदान झाले आणि याप्रकरणी रिसोड येथील डॉक्टरांवर सुरेखा यांचे पती गणेश काबरा यांनी तक्रार दाखल केली आहे.

 नायगावच्या रहिवाशाचा कोरोना संशयिताने मृत्यू; वसई-विरारमध्ये चिंता वाढली

वसईतील नायगाव येथील खोचीवाडा परिसरात राहणाऱ्या 42 वर्षीय विनीत विजय किणी याचा संशयित कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी मुंबईतील रहेजा रुग्णालयात उपचार घेत असताना प्राण सोडला. विनीत किणी यांना काही दिवसांपासून तब्येतीची तक्रार होती. त्यानंतर तपासणीमध्ये त्यांना संशयित कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान त्यांना तातडीने रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला आणि शनिवारी त्यांचा मृतदेह राहत्या घरी न आणता मुंबईतच अंतिमसंस्कार करण्यात आले. 

कोरोनाचा संसर्ग काहीसा नियंत्रणात आला असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असतानाच पुन्हा अशा घटनांमुळे वसई-विरार परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा धोका पूर्णतः टळलेला नसून नागरिकांनी अजूनही योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. या प्रकारामुळे वसई-विरारमध्ये करोना पुन्हा डोकं वर काढत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग याबाबत काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 July 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget